आजपासून भारतात सुरू झालं 'या' पॉवरफुल Electric Car चं बुकिंग; सिंगल चार्जमध्ये जाणार 470Kms
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 14:45 IST
1 / 8जग्वार इंडियाने आपल्या नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही I-Pace Black साठी अधिकृत बुकिंगची घोषणा केली. जागतिक बाजारपेठेत, या एसयूव्हीला त्याच्या जबरदस्त लूक आणि डिझाइनमुळे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.2 / 8कंपनीने नवीन I-Pace Black एडिशनला नावाप्रमाणेच ब्लॅक फिनिश दिले आहे, ज्याचा वापर फ्रंट ग्रिल, स्राउंड ग्रिल, साइड विंडो आणि एसयूव्हीच्या मागील बाजूस देखील करण्यात आला आहे. आकर्षक 19-इंच डायमंड कट अॅलॉय व्हील्स या एसयूव्हीची साइड प्रोफाइल या कारला अधिक चांगला लूक गेतात. यालादेखील ग्लॉस डार्क ग्रे शेडनं सजवण्यात आलं आहे. 3 / 8यामध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ही स्पेशल एडिशन इलेक्ट्रीक कार गेल्या एप्रिलमध्ये जागतिक बाजारात सादर करण्यात आली.4 / 8कंपनीने या इलेक्ट्रीक SUV मध्ये 90 kWh क्षमतेचे बॅटरी पॅक दिले आहे. त्यात देण्यात आलेल्या दोन इलेक्ट्रीक मोटर्स 396 bhp आणि 696 Nm टॉर्क जनरेट करतात. 5 / 8कंपनीचा दावा आहे की ही कार 0 ते 100 किमी प्रतितासाचा स्पीड केवळ 4.8 सेकंदात पकडण्यास सक्षम आहे. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ही SUV 470 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते.6 / 8जग्वार आय-पेस ब्लॅक एडिशन 100 किलोवॅटच्या रॅपिड चार्जरच्या मदतीने फक्त 45 मिनिटांत 80% पर्यंत चार्ज होते, ज्यात फास्ट चार्जिंग सिस्टम आहे. 7 / 8त्याच वेळी, 7 किलोवॅट एसी वॉल बॉक्स चार्जरसह पूर्णपणे चार्ज करण्यासाठी या कारला 10 तास लागतात. जग्वार लँड रोव्हरने देशभरातील 19 शहरांमधील 22 रिटेल शोरूममध्ये चार्जर इन्स्टॉल केले आहेत.8 / 8मात्र, कंपनीने अद्याप या ब्लॅक एडिशनची किंमत जाहीर केलेली नाही. पण जग्वार I-Pace इलेक्ट्रिक SUV ची किंमत 1.06 कोटी ते 1.12 कोटी दरम्यान आहे. असे मानले जाते की त्याची किंमत देखील याच्या आसपास असेल. लवकरच या SUV ची किंमत उघड करण्यात येईल.