अशी संधी पुन्हा नाही! या कारवर २ लाख रुपयांपर्यंत सूट, शेवटचे ५ दिवस राहिले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 13:31 IST
1 / 8जर तुम्ही कार खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. नोव्हेंबर महिन्यात अनेक कारवर कंपन्यांनी मोठी सूट दिलेली आहे. आता महिन्यातील शेवटचे फक्त सहा दिवस राहिले आहेत, या महिन्यात कार खरेदी केल्यास तुम्हाला २ लाखापर्यंत सूट मिळू शकते. 2 / 8Hyundai Kona EV: Hyundai च्या या इलेक्ट्रिक SUV कारवर कंपनीकडून 1 लाख रुपयांची सूट मिळत आहे.3 / 8Mahindra Scorpio: तुम्हाला महिंद्राच्या कारवरही सूट मिळत आहे. या कारवर 1 लाख 95 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यामध्ये 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 1,75,000 रुपयांची सूट मिळत आहे. 4 / 8Skoda Kushaq: या कारवर तुम्हाला 1 लाख रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. या कारवर तुम्हाला कॉर्पोरेट सूट, एक्सचेंज बोनस आणि लॉयल्टी ऑफर मिळू शकते.5 / 8Volkswagen Taigun: या कारवर तुम्हाला 1 लाख रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. यामध्ये लॉयल्टी ऑफर, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट डिस्काउंट इत्यादींचा समावेश आहे.6 / 8Mahindra XUV300 : महिंद्राच्या या कारवर 70 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यामध्ये 29,000 रुपयांपर्यंत सवलत तसेच 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 10,000 रुपयांच्या अॅक्सेसरीज आणि 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.7 / 8Jeep Compass: या कारवर तुम्हाला 80,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. कंपास नाईट ईगलवर ही ऑफर देत आहे. पेट्रोल मॉडेलवर 60,000 रुपये तर डिझेल मॉडेलवर 80,000 रुपयांचा पर्यंत सूट मिळत आहे.8 / 8Honda WRV : या होंडा कारवर कंपनीकडून 70 हजार रुपयांची सूट मिळत आहे, यामध्ये 30 हजार कॅश डिस्काउंट, 10 हजार एक्सचेंज बोनस आणि 33 हजार अॅक्सेसरीज देण्यात येत आहेत.