1 / 8जगभरात इलेक्ट्रीक स्कूटरची मागणी झपाट्यानं वाढत आहे. नवनवीन ब्रँड बाजारात येत असले तरी होंडाच्या इलेक्ट्रीक स्कूटरची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. दरम्यान जपानी दुचाकी उत्पादक कंपनी होंडानं (Honda) जागतिक बाजारपेठेत आपली पहिली इलेक्ट्रीक स्कूटर Honda M1 सादर केली आहे. 2 / 82025 पर्यंत कंपनी 10 नव्या इलेक्ट्रीक स्कूटर्स सादर करणार असल्याचं यापूर्वी कंपनीनं सांगितलं होतं. ही स्कूटर कंपनीच्या याच योजनेचा एक भाग आहे. 2040 पर्यंत कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये फक्त इलेक्ट्रीक वाहनांचाच समावेश करण्याची कंपनीची योजना आहे.3 / 8तरूण वर्गाच्या गरजा लक्षात घेऊन Honda M1 कंपनीनं तयार केली आहे. यामध्ये ईएमचा अर्थ इलेक्ट्रीक मोपेड असा आहे. शहरातील रोजच्या वापराला लक्षात घेऊन ही स्कूटर तयार करण्यात आलीये. 4 / 8यात कंपनीनं होंडा मोबाईल पॉवर पॅक म्हणजेच स्वॅपेबल बॅटरीचा वापर केलाय. ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 41.3 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देणार असल्याचं म्हटलं जातंय. तसंच या स्कूटरचा टॉप स्पीड 45 किमीचा आहे.5 / 8यामध्ये इलेक्ट्रीक मोटरला 0.58 kW क्षमतेचे पॉवर आऊटपूट देण्यात आलं असून ती 1.7 kW टॉर्क जनरेट करते. ही स्कूटर 75 किलो वजनासह 10 डिग्री अँगलही चढू शकते असं कंपनीनं म्हटलंय. ECON मोड थ्रॉटल ऑपरेशन सॉफ्ट करतं आणि टॉप स्पीड कमी करतं. त्यामुळे ड्रायव्हिंग रेंजही वाढते.6 / 8Honda EM1 मध्ये कंपनीने मोबाईल पॉवर पॅक म्हणजेच स्वॅप करण्यायोग्य बॅटरी वापरली आहे. ही बॅटरी स्कूटरमधून काढून घरी लावण्यात आलेल्या चार्जरला जोडून तुम्ही सहजपणे चार्ज करू शकता. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये, कंपनीने डिजिटल इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले, सीटखालील स्टोरेज स्पेस, यूएसबी सॉकेट, मागे बसलेल्या व्यक्तीसाठी पायलॉन फूटपेग आणि रिअर कॅरियर देण्यात आलेय.7 / 8बॅटरीसह या स्कूटरचं वजन 95 किलो आहे. तसंच कॉम्पॅक्ट साईज आणि वजनानं हल्की असल्यानं ही इलेक्ट्रीक स्कूटर उत्तम परफॉर्मन्स देत असल्याचा दावा कंपनीचा दावा आहे.8 / 8या स्कूटरच्या पुढील भागात 31 मिमी टेलिस्कोपिक फॉर्क आणि मागील बाजूला डबल ट्यूब डॅम्पर्ससह ट्विन रिअर शॉक ॲब्झॉर्बर सस्पेंशन देण्यात आलेय. ब्रेकिंगबाबत सांगायचं झालं तर फ्रन्टला 190 एमएम सिंगल पिस्टन कॅलिपर डिस्क आणि मागील बाजूला 110 एमएम ड्रम ब्रेक देण्यात आलाय.