दिवाळीनिमित्त ₹1.51 लाखांची बचत; टाटा-मारुतीनंतर Honda ने आणली खास ऑफर, पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 14:34 IST
1 / 6 GST 2.0 लागू झाल्यानंतर टाटा आणि मारुतीसारख्या मोठ्या कंपन्यांनी आपल्या सर्व गाड्यांच्या किमती कमी केल्या आहेत. याचा परिणाम विक्रीवर दिसून येतोय. किमती घटल्याने गाड्यांच्या विक्रीत विक्रमी वाढ झाली आहे. 2 / 6 त्यात भर म्हणून, मारुती, टाटा, महिंद्रा आणि ह्युंडाईने GST कपातीबरोबरच दिवाळीनिमित्त बंपर डिस्काउंटची घोषणा केली आहे. आता या स्पर्धेत होंडानेही एंट्री घेतली असून, दिवाळी निमित्त ₹1.51 लाखांपर्यंतच्या ऑफर्स ग्राहकांसाठी आणल्या आहेत.3 / 6 होंडा अमेझ- होंडाची सर्वाधिक परवडणारी कार ‘होंडा अमेझ’वर ₹98,000 पर्यंत फेस्टिव्ह बोनस मिळतोय. ही कार एक कॉम्पॅक्ट सेडान असून, 1.2-लीटर पेट्रोल इंजिनसह येते. हे इंजिन 90 BHP ची पॉवर निर्माण करण्यास सक्षम आहे. यात मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक, दोन्ही ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध आहेत.4 / 6 होंडा सिटी- होंडाची सर्वात लोकप्रिय होडां सिटीवर ₹1.27 लाखांपर्यंतची ऑफर मिळत आहे. यात 1.5-लीटर i-VTEC पेट्रोल इंजिन आहे, जे CVT आणि 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन दोन्ही प्रकारात येते. होंडा सिटीची ओळख तिच्या प्रीमियम इंटीरियर, विस्तृत सीट्स, सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, क्रूज कंट्रोल सारख्या लक्झरी फीचर्ससाठी आहे.5 / 6 होंडा एलिवेट- हुंडाई क्रेटाशी स्पर्धा करणाऱ्या होंडा एलिवेट वर सध्या सर्वात मोठा ₹1.51 लाखांपर्यंतचा डिस्काउंट मिळतोय. ही नवी कॉम्पॅक्ट SUV अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे आणि सणांच्या काळात तिची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. एलिवेटमध्ये 1.5-लीटर i-VTEC पेट्रोल इंजिन आहे, जे 121 BHP पॉवर आणि 145 Nm टॉर्क निर्माण करते. ही कार 6-स्पीड मॅन्युअल तसेच CVT ऑटोमॅटिक या दोन्ही पर्यायांसह उपलब्ध आहे.6 / 6 होंडा सिटी हायब्रिड- होंडा सिटी हायब्रिड वर रोख सूट नाही, मात्र कंपनीने ग्राहकांसाठी 7 वर्षांच्या एक्स्टेंडेड वॉरंटी पॅकेजची विशेष ऑफर आणली आहे. मागील उद्दिष्ट हायब्रिड तंत्रज्ञानावरील ग्राहकांच्या शंका दूर करणे आणि दीर्घकालीन विश्वास वाढवणे हे आहे.