शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

टाटा अल्ट्रोजपासून हॅरियरपर्यंत, 'या' ६ कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! वाचू शकतात १.४० लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 10:54 IST

1 / 8
सणासुदीच्या काळात विक्री वाढवण्यासाठी कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्याची एकही संधी सोडत नाहीत. जर तुम्हीही टाटा मोटर्सची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ऑक्टोबर महिना सर्वोत्तम आहे! कारण या महिन्यात टाटा मोटर्स आपल्या अनेक लोकप्रिय गाड्यांवर तब्बल १ लाख ४० हजार रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी देत आहे.
2 / 8
जीएसटी दरातील कपातीसोबत टाटा मोटर्स देत असलेल्या या बंपर सवलतींमुळे कंपनीची विक्री मोठ्या प्रमाणात वाढू शकते. Tata Altroz, Tata Nexon, Tata Harrier, Tata Safari, आणि Tata Curvv यांसारख्या लोकप्रिय मॉडेल्सवर मोठा डिस्काउंट मिळत आहे.
3 / 8
टाटा कर्व: टाटाच्या या पहिल्या कूप एसयूव्हीवर २०२४ मॉडेलवर ३०,००० रुपये रोख आणि २०२५ मॉडेलवर २०,००० रुपये रोख आणि २०,००० रुपयांचा एक्सचेंज/स्क्रॅप बोनस दिला जात आहे.
4 / 8
टाटा नेक्सॉन: ५ स्टार सेफ्टी रेटिंग असलेल्या या एसयूव्हीला २०२४ मॉडेलवर ३५,००० रुपये रोख आणि १०,००० रुपये एक्सचेंज/स्क्रॅप बोनस आणि २०२५ मॉडेलवर १०,००० रुपये रोख आणि १५,००० रुपये एक्सचेंज/स्क्रॅप बोनस मिळत आहे.
5 / 8
टाटा पंच: टाटाच्या या लोकप्रिय एसयूव्हीवर २०२४ मॉडेलवर २५,००० रुपयांची रोख सूट आणि २०२५ मॉडेलवर ५,००० रुपयांची रोख सूट आणि १५,००० रुपयांची एक्सचेंज/स्क्रॅप सूट दिली जात आहे.
6 / 8
टाटा हॅरियर: या एसयूव्हीच्या २०२४ मॉडेलवर ₹५०,००० ची सूट आणि ₹२५,००० चा एक्सचेंज/स्क्रॅप बोनस दिला जात आहे. जर तुम्ही २०२५ मॉडेल खरेदी केले तर तुम्ही ₹३३,००० ते ₹५८,००० पर्यंत बचत करू शकता.
7 / 8
टाटा सफारी: या वाहनाच्या २०२४ मॉडेलवर ५०,००० रुपयांची बचत ऑफर आणि २५,००० रुपयांचा स्क्रॅप/एक्सचेंज बोनस देखील मिळत आहे आणि २०२५ मॉडेलवर ३३,००० ते ५८,००० रुपये वाचवण्याची संधी आहे.
8 / 8
टाटा अल्ट्रोज: अल्ट्रोज आणि अल्ट्रोज रेसरच्या २०२४ मॉडेल्सवर ₹४०,००० ते ₹८५,००० पर्यंत रोख सूट, ₹२५,००० ते ₹५०,००० पर्यंत एक्सचेंज/स्क्रॅप बोनस दिला जात आहे. शिवाय, २०२४ मॉडेल्सवर एकूण ₹१.४० लाखांपर्यंतचा फायदा मिळतो. दरम्यान, या दोन्ही वाहनांच्या २०२५ पूर्वीच्या फेसलिफ्ट मॉडेल्सवर ₹४०,००० पर्यंत रोख सूट आणि ₹२५,००० पर्यंत एक्सचेंज/स्क्रॅप बोनस दिला जात आहे.
टॅग्स :carकारGSTजीएसटी