Fastag New Rule: टोलनाक्याच्या अलीकडे रिचार्ज करत असाल तर सावधान; १७ फेब्रुवारीपासून फास्टॅगचा नियम बदलणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 17:44 IST
1 / 9एकीकडे केंद्रीय मंत्री गेल्या काही वर्षांपासून टोलनाके गायब होणार, नवीन सॅटेलाईट प्रणालीवरून जेवढे रनिंग तेवढा टोल प्रणाली सुरु होणार, याच्या घोषणांवर घोषणा करत असले तरी काही केल्या फास्टॅगची डोकेदुखी कमी होत नाहीय. 2 / 9बरेच दिवस वापरात नसेल तर तुमचा फास्टॅग ब्लॅकलिस्ट आहे, हे टोल नाक्यावर गेल्यावर समजत आहे. तर दुसरीकडे फास्टॅग ब्लॅकलिस्ट असल्याने दुप्पट टोल भरावा लागत आहे. अशातच फास्टॅग चालत नसेल तर मागच्या वाहनांना वेळ होत आहे ते वेगळेच. आता तर आणखी एक दुखणे वाहन चालकांसाठी येऊ घातले आहे. 3 / 9एनपीसीआयने येत्या १७ फेब्रुवारीपासून नवीन फास्टॅग बॅलन्स व्हॅलिडेशन नियम लागू केला आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या फास्टॅगबाबत अधिक जागरुक राहण्याची गरज निर्माण झाली आहे. तुम्ही ही काळजी घेतली नाही तर फास्टॅग अॅक्टीव्ह करूनही तुम्हाला डबल पैसा मोजावा लागण्याची शक्यता आहे.4 / 9जर टोल नाक्यावर जाण्यापूर्वी म्हणजेच फास्टॅग रीड करण्यापूर्वी ६० मिनिटांपर्यंत फास्टॅग ब्लॅकलिस्ट राहिलेला असेल तर तुमचे पेमेंट होणार नाही. यामुळे जर तुम्ही अशा अटीत सापडला तर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे. 5 / 9हा नवीन नियम फास्टॅग सुरु करण्यासाठी म्हणजेच फास्टॅगचा स्टेटस सुधारण्यासाठी ७० मिनिटांचा काळ देणार आहे. म्हणजेच टोल नाक्यावर जाण्यापूर्वी ६० मिनिटे आधी तुम्हाला तुमचा फास्टॅग अॅक्टिव्ह करावा लागणार आहे. 6 / 9अनेकदा फास्टॅग ब्लॅकलिस्ट असल्याचे समजल्यावर टोल नाक्याच्या आधी किंवा टोल नाक्यावर रिचार्ज केले जात होते. या ऐनवेळेच्या रिचार्जलाच आता बंदी घालण्यात आली आहे. यामुळे आधी तुम्हाला तुमचा फास्टॅग ब्लॅकलिस्ट आहे का हे पहावे लागणार आहे. त्यानंतरच तो अॅक्टिव्ह करून प्रवासाला निघावे लागणार आहे. 7 / 9फास्टॅग रीड झाला आणि जर तो ब्लॅकलिस्ट असेल तर तुमच्याकडून दुप्पट टोल घेतला जाणार आहे. टोलनाका पार केल्यानंतर जर तुम्ही १० मिनिटांत फास्टॅग अॅक्टिव्ह केला तर तुम्ही दुप्पट दिलेल्या टोलला अपिल करून वरचे पैसे परत मिळवू शकता. 8 / 9तुमचा फास्टॅग ब्लॅकलिस्ट आहे की नाही हे तुम्हाला तपासावे लागणार आहे. यासाठी परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 'ई-चालान स्थिती तपासा' किंवा तत्सम पर्याय निवडा. वाहन नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा. तिथे तुम्हाला फास्टॅग ब्लॅकलिस्ट आहे की नाही ते समजणार आहे. शिवाय फास्टॅग ज्या कंपनीचा आहे, त्यांच्याकडेही समजू शकणार आहे. 9 / 9फास्टॅग ब्लॅकलिस्ट होण्यामागे दोन महत्वाची कारणे आहेत, नियम वेळोवेळी बदलत असतात. याची माहिती घेत राहणे, तसेच केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आणि फास्टॅगमधील बॅलन्स मेन्टेन ठेवणे.