शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Electric Vehicle: पेट्रोल-डिझेल वाचवण्याची इच्छा जीवघेणी ठरू नये, इलेक्ट्रिक वाहनांना आग लागल्याने ग्राहकांमध्ये भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 5:35 PM

1 / 10
Electric Vehicle Fire Case: पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले असून सर्वसामान्य नागरिक आता त्याच्या पर्यायाकडे वाटचाल करत आहेत. कार खरेदी करणे प्रत्येकाच्या बजेटमध्ये बसत नाही, त्यामुळे लोक पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकींऐवजी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करत आहेत.
2 / 10
मात्र गेल्या दोन महिन्यांत इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागल्याची अनेक प्रकरणे समोर आली असून, त्यामुळे ग्राहकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणांमध्ये आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून ही बाब भारत सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.
3 / 10
या प्रकरणाची तातडीने दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकरणांच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे. तसेच, गडकरींनी ईव्ही निर्मात्यांना इशाराही दिला.
4 / 10
'जे इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक त्यांच्या उत्पादनांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहेत, त्यांच्याविरोधात केंद्र सरकार कठोर पावले उचलली जातील. तसेच, अशा कंपन्यांवर मोठा दंड आकारला जाईल,' असे ते म्हणाले.
5 / 10
इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागल्याच्या घटनेने ग्राहकांच्या मनात घर केले आहे. या घटना इलेक्ट्रिक वाहने जलदगतीने स्वीकारण्याच्या सरकारच्या उद्दिष्टात अडथळा ठरत आहे.
6 / 10
ही भीती दूर करण्यासाठी सरकारने इलेक्ट्रिक स्कूटरला लागलेल्या आगीचे कारण शोधण्यासाठी एक समिती स्थापन केली होती, ज्याचा अहवाल नुकताच समोर आला आहे.
7 / 10
या अहवालात निकृष्ट दर्जाच्या बॅटरी सेलच्या वापरामुळे इलेक्ट्रिक स्कूटर्सना आग लागल्याचे समोर आले आहे. या यादीत ओला इलेक्ट्रिक, प्युअर ईव्ही आणि ओकिनावा यांसारख्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादकांची नावे समाविष्ट आहेत.
8 / 10
इलेक्ट्रीक वाहने पर्यावरण सुधारण्यात सर्वात मोठे योगदान देणार आहेत. त्यामुळेच इलेक्ट्रिक वाहने व्यवहारात आणण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
9 / 10
तुम्ही इलेक्ट्रिक टू-व्हीलर घेतली असेल किंवा घ्यायची असेल तर काही खबरदारी घेतल्यास अपघात टाळता येतील. सर्वप्रथम, तुम्हाला बॅटरीसाठी योग्य असलेल्या 15 amp सॉकेटमधूनच बॅटरी चार्ज करायची आहे. यामुळे शॉर्ट सर्किट होत नाही आणि बॅटरीमध्ये स्फोट किंवा आग होत नाही.
10 / 10
याशिवाय, जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटरने बॅटरी चार्ज करत असाल किंवा डिटॅच करत असाल, तर अशा ठिकाणी चार्ज करा जिथे अपघात झाला तरी कोणाच्या जीवाला धोका होणार नाही.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरfireआगNitin Gadkariनितीन गडकरी