Electric Vehicle: देशातील पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाईक या आठवड्यात होणार लाँच, जाणून घ्या किंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 15:50 IST
1 / 8 इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी 'कोमाकी' या आठवड्यात बाजारात आपली रेंजर इलेक्ट्रिक क्रूझर लॉन्च करण्याची दाट शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी रेंजर इलेक्ट्रिक बाईक अधिकृतपणे समोर आली होती.2 / 8 बईकचे फोटो व्हायरल झाल्यानंतर या बाइकची काही वैशिष्ट्ये देखील समोर आली होती. कोमाकीची ही रेंजर ई-क्रूझर देशात विक्रीसाठी जाणारी पहिली इलेक्ट्रिक क्रूझर असेल.3 / 8 या बाईकमध्ये 4kWh चा बॅटरी पॅक असेल, जो भारतातील इलेक्ट्रिक दुचाकीमध्ये आढळणारा सर्वात मोठा बॅटरीपॅक असल्याचा दावा केला जातोय. या बॅटरीतून त्याच्या 5,000-वॅट मोटरला उर्जा मिळेल.4 / 8 कंपनीचा दावा आहे की, या इलेक्ट्रिक बाईकची रेंज एका चार्ज सायकलमध्ये 200 किमी पेक्षा जास्त आहे. पण, प्रत्यक्षात रस्त्यावर चालवल्यानंतरच याची रेंज कळू शकेल.5 / 8 मजबूत असण्यासोबतच या बाईकमध्ये क्रूझ कंट्रोल फीचर, रिपेअर स्विच, रिझर्व्ह स्विच, ब्लूटूथ आणि अॅडव्हान्स ब्रेकिंग यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.6 / 8 या बाईकची किंमत अद्याप कंपनीने जाहीर केलेली नाही. पण, कंपनी आश्वासन देत आहे की या बॅटरीवर चालणाऱ्या क्रूझरची एकूण किंमत परवडणाऱ्या श्रेणीत ठेवली जाईल. 7 / 8 एका अंदाजानुसार, या बाईकची किंमत 1 लाख ते 1.2 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. सध्या, कोमाकी इतर अनेक इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइक्स देखील ऑफर करते, ज्यांची किंमत एक्स-शोरूम ₹30,000 ते ₹1 लाख दरम्यान आहे.8 / 8 भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये सध्या इलेक्ट्रिक स्कूटरचे वर्चस्व आहे. इलेक्ट्रिक मोटरसायकलची संख्या खूपच कमी आहे. पण, आता या इलेक्ट्रिक क्रूझर मोटरसायकलमुळे बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.