Electric Vehicle: Hondaच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, लवकरच येणार Activaचे इलेक्ट्रीक व्हर्जन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 15:47 IST
1 / 8 नवी दिल्लीः भारतात इलेक्ट्रीक गाड्यांचे मार्केट झपाट्याने वाढत आहे. सध्या हिरोसह अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रीक स्कूटर आणि मोटारसायकल मार्केटमध्ये आहेत. यात आता होंडाचे नाव जोडले जाणार आहे.2 / 8 होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे (Honda Motorcycle & Scooter India ) अध्यक्ष असुशी ओगाता यांनी सांगितल्यानुसार, होंडा लवकरच भारतात ईव्ही सेगमेंटमध्ये एंट्री करणार आहे. 3 / 8 एका मीडिया हाउसला दिलेल्या मुलाखतीत ओगाता म्हणाले की, पुढील आर्थिक वर्षात होंडा इलेक्ट्रिक व्हिकल लॉन्च करणार आहे. होंडाने मागच्या वर्षीच इलेक्ट्रीक व्हिकलवर काम सुरू केले होते. 4 / 8 मिळालेल्या माहितीनुसार, होंडा सध्या बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञानावर काम करत आहे. यासाठी कंपनीने होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि. नावाची सब्सिडिअरी कंपनी सुरू केली आहे.5 / 8 ही कंपनी बंगळुरुमध्ये इलेक्ट्रिक टू-व्हीलरचे पायलेट रन टेस्ट करत आहे. यापूर्वी बाउंस इलेक्ट्रिकने सब्सक्रिप्शनच्या आधारावर बॅटरी स्वॅपिंग मॉडेल सादर केले आहे.6 / 8 तिकडे, हिरोनेही गोगोरोसोबत या तंत्रज्ञानासाठी करार केला आहे. त्यामुळे लवकरच भारतात बॅटरी स्वॅपिंग इलेक्ट्रिक वाहन पाहायला मिळू शकतात.7 / 8 होंडाने इलेक्ट्रीक सेगमेंटमध्ये एंट्री करण्याची घोषणा केल्यानंतर कंपनीची सर्वात लोकप्रिय अॅक्टिव्हा नवीन इलेक्ट्रीक व्हर्जनमध्ये लॉन्च होणार असल्याचा अंदाज लावला जात आहे.8 / 8 याची टक्कर बजाज चेतक, टीव्हीएस आयक्यूब इलेक्ट्रिक आणि आगामी सुजुकी बर्गमन इलेक्ट्रिकसोबत असेल. अॅक्टिव्हा भारतीय बाजारात खूप लोकप्रिय असून, याचे इलेक्ट्रीक व्हर्जन गेम चेंजर ठरू शकते, असा कंपनीचा दावा आहे.