शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Diwali 2021 Cars Offer: 'या' कार्सवर मिळतंय १ लाखांपर्यंत बंपर डिस्काऊंट; २ वर्षांपर्यंत मोफत सर्व्हिसिंग, पाहा ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2021 4:28 PM

1 / 9
जर या दिवाळीत (Diwali) तुम्ही कमी किमतीत कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. भारतातील सर्वात मोठे मोबिलिटी प्लॅटफॉर्म ओलानं (OLA) ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर सादर केली आहे.
2 / 9
ओलाने भारतातील सर्वात मोठे 'प्री ओनड कार फेस्टिव्हल' जाहीर केले आहे. या कार फेस्टिव्हलमध्ये तुम्ही कार खरेदी केल्यास तुम्हाला 1 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. सवलतीसोबतच तुमच्या कारची 2 वर्षांसाठी मोफत सर्व्हिसिंग, 12 महिन्यांची वॉरंटी आणि 7 दिवसांची रिटर्न पॉलिसी अशा अनेक ऑफर्सही दिल्या जात आहेत.
3 / 9
“या दिवाळीत ओला कार्स (Ola Cars) अनेक उत्तम आणि आकर्षक ऑफर देत आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना नवीन वाहन खरेदी करण्याच्या अनुभवापेक्षाही चांगला अनुभव देणार आहोत,' अशी प्रतिक्रिया ओला कार्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण सरदेशमुख यांनी दिली.
4 / 9
विशेष म्हणजे यासाठी त्यांना कुठेही जावं लागणार नाही, तर त्यांना घरबसल्या या सर्व सुविधा मिळणार आहेत. या अंतर्गत, ओला कार्स प्लॅटफॉर्मवर 2000 हून अधिक उत्कृष्ट डील आणि ऑफर दिल्या जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
5 / 9
तुम्हाला या ठिकाणी ओला अॅपद्वारे (OLA App) नवीन आणि सेकंड हँड दोन्ही वाहने खरेदी करता येतील. वाहन खरेदीपासून फायनॅन्स, रजिस्ट्रेशन, विमा, मेंटेनन्स आणि कार सर्व्हिसिंग यासारख्या सेवा देखील येथे पुरविल्या जाणार आहेत.
6 / 9
एवढंच नाही तर ग्राहकांना हवं असल्यास ते त्यांचं वाहन पुन्हा ओला कार्सला विकू शकतात. म्हणजेच आता ग्राहकांना कार खरेदी करण्याचं आणि विक्रीची चिंता राहणार नाही. ज्या ग्राहकांना कोणत्याही समस्येशिवाय कार खरेदी करायची असेल किंवा त्याची विक्री करायची असेल त्यांच्यासाठी हे वन स्टॉप शॉप असणार आहे.
7 / 9
ओला कार्सनं महिन्याभरातच तब्बल 5 हजार वाहनांची विक्री केली असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. याचाच अर्थ लोकांमध्येही याची क्रेझ दिसून येत आहे. ओला कार्सनं 300 सेंटर्ससह 100 शहरांमध्ये आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे.
8 / 9
इतकंच नाही, तर तुम्ही या कार फेस्टिव्हलमध्ये कोणतीही कार खरेदी केली तर तुम्हाला त्यावर 1 लाख रूपयांचा डिस्काऊंट देण्यात येणार असल्याची घोषणा कंपनीनं केली आहे. याशिवाय 2 वर्षांपर्यंत कारची मोफत सर्व्हिस. 12 महिन्यांची वॉरंटी आणि 7 दिवसांच्या रिटर्न पॉलिसीचाही समावेश केला जाणार असल्याचं कंपनीनं सांगितलं.
9 / 9
जुन्या म्हणजेच सेकंड हँड कार्सना Pre Owned Car असं म्हटलं जातं. या कार्सची आधीही विक्री केलेली असते. परंतु त्या मालकानं ती गाडी विकल्यानंतर त्याची पुन्हा विक्री केली जाते. गेल्या काही काळापासून देशात Pre Owned Car चं मार्केट मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या ठिकाणी लोकांना स्वस्तात चांगल्या कार्स विकत घेण्याची संधी मिळते.
टॅग्स :OlaओलाcarकारIndiaभारत