कार वाढल्या, चोऱ्या वाढल्या! तुमचे वाहन कसे वाचवाल? या पाच गोष्टी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 13:05 IST
1 / 7देशात वाहनांची संख्या खूप आहेच, पण त्यात दर महिन्याला तीन लाखांवर वाहनांची भरही पडते आहे. अशात वाहनांची चोरी देखील वाढली आहे. यामुळे तुमची कार चोरीला जाण्याची शक्यता वाढलेली आहे. अशावेळी लाखोंची कार वाचविण्यासाठी काय काय करता येईल...2 / 7कारमध्ये सेफ्टी फिचर्स असतात. ते देखील आता अपुरे पडू लागले आहेत. परंतू, सर्वच चोर काही हुशार नसतात, यामुळे तुमचे लक आणि चोराचे बॅडलक असेल तर कार सापडते. जर तुमच्या कारमध्ये सेफ्टी फिचर्स नसतील तर तुम्ही ती बसवून घेऊन कार सुरक्षित करू शकता. 3 / 7आता तसे सर्वच कारमध्ये सेंट्रल लॉक सिस्टिम येतेच. परुंतू, जर तुमची कार थोडी जुनी असेल तर तुम्ही काही हजारात ती बसवून घेऊ शकता. यामुळे तुम्ही एका चावीने कार लॉक करताना सर्व दरवाजे आणि डिक्की देखील लॉक करू शकता. जर ती कोणी तुमची कार उघडण्याचा प्रयत्न केला तर अलार्म वाजेल आणि आजुबाजुला लोक जागे होतील. यामुळे कार चोरीपासून वाचेल.4 / 7तुमची कार सर्वात सुरक्षित करायची असेल तर तुम्ही कारचे स्टिअरिंग लॉक करू शकता. कारची चावी काढल्यानंतर तुम्ही स्टिअरिंग लॉक करू शकता. एकदा का स्टिअरिंग लॉक झाले की ते पुन्हा फिरविता येत नाही. चावी लावूनच तुम्ही ते अनल़ॉक करू शकता. 5 / 7कारमध्ये गिअर सिस्टिमही लॉक करता येते. कार बंद करताना जर तुम्ही कारचा गिअर लॉक केला आणि जर एका गिअरमध्ये कार ठेवली तर कारची सुरक्षा आणखी वाढते. यासाठी काही जुगाडदेखील इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. 6 / 7टायर लॉक हा देखील एक सुरक्षेचा प्रकार आहे. टायरचे लॉक बाजारात उपलब्ध आहेत. परंतू, शातिर चोर टायर बदलून देखील कार चोरी करू शकतात. ज्यांना हे शक्य नाही, ते ती कार तिथेच सोडून जाऊ शकतात. 7 / 7जर तुमची कार चोरी झाली तर कारमधील जीपीएस सिस्टिमद्वारे ती कुठे आहे ती शोधता येते. परंतू ही सिस्टिम तुम्ही बाहेरून कनेक्ट केलेली असेल तर चोर ती काढून टाकतात. त्यासाठी आता स्वतंत्र चार्ज झालेले जीपीएस डिव्हाईस देखील येत आहे. जे तुम्ही कुठेही लपवून ठेवू शकता.