एकच FASTag दोन गाड्यांना वापरता येतो? जाणून घ्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 15:16 IST
1 / 10फास्टॅग देशभरात 15 फेब्रुवारीपासून गरजेचे झाले आहे. नाहीतर दुप्पट टोल आकारला जातोय. यामुळे वादावादी, इशारे यामुळे टोलनाक्यांवर 7-8 किमी रांगा लागल्याचे व्हिडीओदेखील व्हायरल झाले आहेत. आता एखाद्याकडे दोन, तीन वाहने आहेत सर्वांनाच वेगवेगळा फास्टॅग वापरायचा की एकच अशापासून कोणता फास्टॅग चांगला, कोणता फायद्याचा आदी गोष्टींचे अनेक प्रश्न आपल्या मनात घोळू लागले आहेत.2 / 10पहिला अनुभव आपणच घ्यायचा का? पुढच्यास ठेच मागचा शहाणा होता येणार नाही का...आम्ही पहिल्या टप्प्यात थोडे आणि नंतरच्या टप्प्यात आणखी काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे तुम्हाला देणार आहोत. कदाचित हे प्रश्न तुम्हाला पडलेदेखील नसतील किंवा भविष्यात पडू शकतात. चला तर मग पाहूया या प्रश्नांची उत्तरे. 3 / 10FASTag ची वैधता ही 5 वर्षांची आहे. भारतात फास्टॅग येऊन तीन वर्षे झाली आहेत. आणखी वर्षभराने तेव्हा ज्यांनी फास्टॅग घेतलेत त्यांना ते एकतर रिन्यू करण्याचा पर्याय मिळेल किंवा नवीन फास्टॅग खरेदी करावा लागेल. नवीन कार रजिस्टर करण्यासाठी काही आरटीओंनी तेव्हा फास्टॅग गरजेचा केला होता. 4 / 10रस्ते मंत्रालानुसार FASTag ची किंमत 100 रुपये आहे. काही बँका हे फास्टॅग मोफतही देत आहेत. काही बँका FASTag लिंक असलेल्या वॉलेटला पैसे ट्रान्सफर करण्यासाठी ग्राहकांकडून जादाचे पैसे आकारतात. याचीमाहिती टॅग जारी करणाऱ्या बँकेच्या वेबसाईटवर पाहून तो खरेदी करावा. 5 / 10जर तुम्हाला तुमचा फास्टॅग बदलायचा असेल तर बँकेची वेबसाईट किंवा NETC ग्राहक सेवा केंद्रावर जावे लागणार आहे. तिथे तुम्हाला फास्टॅग बदलून देण्यात येईल. 6 / 10ग्राहक एका वाहनासोबत एकच फास्टॅग वापरू शकतो. एकदा गाडीच्या काचेवर फास्टॅग चिकटवला की तो काढता येत नाही.असे केल्यास तो नष्ट होईल आणि टोल नाक्यावर काम करणार नाही. यामुळे दुसरी गाडी असेल तर तिलाही दुसरा फास्टॅग घ्यावा. 7 / 10असे झाल्यास ग्राहकाने त्याची माहिती संबंधित बँकेच्या कस्टमर केअरला देणे गरजेचे आहे. तो फास्टॅग ब्लॅकलिस्ट करावा लागतो. या फास्टॅगचा कोणी दुरुपयोग करू शकतो. असे केल्यास तुमच्या खात्यातून पैसे कापले जाणार नाहीत. नवीन फास्टॅगसाठी अर्ज करावा. जुन्या फास्टॅगचे पैसे परत घ्यावेत. 8 / 10जर तुमचे वाहन हरविल्यास फास्टॅग बँकेला सांगून बंद करता येईल. बंद न करण्याचा फायदा असा की, जर तुमची कार चोरट्याने कोणत्या टोलनाक्यावरून नेली आणि जर तुमच्या टॅगवरील पैसे कापले गेले तर तुम्हाला चोर कुठे गेला याचा माग काढता येईल. चोरही स्मार्ट झालेत, यामुळे ते फास्टॅग काढूनही टाकू शकतात. एखाद दुसऱ्या केसमध्ये हा फायदा होऊ शकेल. 9 / 10जर ग्राहकाने पैसे ट्रान्सफर केले असतील आणि ते फास्टॅगवर गेले नसतील तर त्वरित बँकेला फोन करून तक्रार द्यावी. पैसे परत देण्यासाठी त्यांना सांगावे.10 / 10नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (NETC) सिस्टीममुळे ग्राहक RFID तंत्रज्ञानाचा वापर करून टोलनाक्यांवर न थांबता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे देऊ शकतो.