शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

10 लाखांपेक्षा कमी किमतीत येणाऱ्या ऑटोमॅटिक कार, पाहा किंमत अन् फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 18:30 IST

1 / 7
Automatic Cars Under 10 Lakhs: भारतीय कार बाजारात ऑटोमॅटिक कारची मागणी वाढत आहे. बाजारात ऑटोमॅटिक कारसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे ग्राहकांना आपल्या पसंतीची गाडी घेणे सोपे झाले आहे. तुम्ही कार घेण्याच्या विचारात असाल आणि तुमचे बजेट 10 लाख रुपयांपर्यंत असेल, तर तुम्हाला ऑटोमॅटिक कार्समध्ये अनेक चांगले पर्याय मिळतील.
2 / 7
ग्राहकांच्या आवडीनिवडी बदलत आहेत. आता त्यांना चांगले फीचर्स आणि आरामदायी कार हवी आहे. त्यासाठी जास्त किंमत मोजण्याचीही त्यांची तयारी आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि टाटा मोटर्स सारख्या कार कंपन्या 10 लाख रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये ऑटोमॅटिक कार ऑफर करत आहेत. तुम्हालाही सणासुदीच्या काळात नवीन ऑटोमॅटिक कार घ्यायची, असेल तर तुम्ही या 5 कारचा विचार करू शकता.
3 / 7
टाटा पंच: टाटा पंच, देशातील सर्वात सुरक्षित कार्सपैकी एक आहे. या मायक्रो-एसयूव्हीला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. टाटा पंच ऑटोमॅटिक व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 7.50 लाख रुपयांपासून सुरू होते. या किंमतीत तुम्हाला टाटा पंच अॅडव्हेंचर व्हेरिएंट खरेदी करता येईल.
4 / 7
मारुती सुझुकी स्विफ्ट: मारुती सुझुकी स्विफ्ट, ही देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक आहे. यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळतो. स्विफ्टला VXI AMT व्हेरिएंटसह ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळतो. स्विफ्ट ऑटोमॅटिकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 7.50 लाख रुपये आहे.
5 / 7
मारुती सुझुकी डिझायर: मारुती सुझुकी डिझायरचे ऑटोमॅटिक व्हेरिएंट देखील 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे. VXI AT व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख रुपये आहे.
6 / 7
मारुती सुझुकी बलेनो: मारुती सुझुकी बलेनो, ही एक प्रीमियम हॅचबॅक कार आहे. ही भारतातील सर्वाधिक विकल्या जाणार्‍या कार्सपैकी एक आहे. बलेनोमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरिएंट डेल्टा एएमटीपासून सुरू होतात. याची एक्स-शोरूम किंमत 8 लाख रुपये आहे.
7 / 7
ह्युंदाई ऑरा : ह्युंदाई ऑरा, ही एक उत्तम कॉम्पॅक्ट सेडान कार आहे. ही कार 10 लाख रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. या Hyundai कारच्या SX+ AMT व्हेरिएंटमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स उपलब्ध आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 8.84 लाख रुपये आहे.
टॅग्स :AutomobileवाहनcarकारTataटाटाHyundaiह्युंदाईDatsunडॅटसनMaruti Suzukiमारुती सुझुकी