शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

इथरच्या दोन इलेक्ट्रीक स्कूटर; भाडेतत्वावर मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 16:14 IST

1 / 8
बंगळुरु येथील ई-स्कूटर स्टार्टअप कंपनी इथर एनर्जीने आपली पहिली इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केली आहे. महत्वाचे म्हणजे ही स्कूटर जास्तीतजास्त 3 वर्षांच्या कराराने भाडेतत्वावर देण्यात येणार आहे. नुकतेच कंपनीने इथर 450 या मॉडेलची डिलिव्हरी देण्यास सुरुवात केली आहे.
2 / 8
इथरने लीज योजनेची सुरुवात बंगळुरु येथील ऑटोवर्क कंपनीसोबत केली आहे. ही कंपनी या इलेक्ट्रीक स्कूटर भाड्याने घेण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करणार आहे. इथर 340 ची किंमत 1.12 लाख तर 450 ची किंमत 1.27 लाख रुपये असणार आहे.
3 / 8
भाडेकरार 13 महिने ते 3 वर्षांसाठी असणार आहे. इथर 340 साठी महिना 3977 भाडे आकारण्यात येणार आहे. यासाठी 30 हजार रुपये डाऊनपेमेंट करावे लागणार आहे. जे रिफंडेबल असणार आहे.
4 / 8
तर इथरचे 450 हे मॉडेल 4,422 रुपये प्रती महिना या भाडेकराराने मिळणार आहे. डाऊन पेमेंट 40 हजार असणार आहे. याबाबतची माहीती कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे.
5 / 8
इथर 340 चा वेग 80 kmph आहे. तर 450 चा स्पीड 70 kmph आहे. सात इंचाचा डिस्प्लेही देण्यात आला आहे.
6 / 8
दोन्ही टायरना डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.
7 / 8
या दोन्ही स्कूटरमध्ये 2.4 kWh ची बॅटरी असणार आहे.
8 / 8
या बॅटरीची लाईफ 50 हजार किमी आहे.
टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनAutomobileवाहनscooterस्कूटर, मोपेड