E-Vehicle साठी ९० टक्के ग्राहक अधिक खर्च करण्यास तयार; २०० मैलांपर्यंत रेंज असलेल्या कार्सना पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 09:58 IST
1 / 10सध्या देशात मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. सध्या अनेक ग्राहक पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यांकडे पाठ फिरवताना दिसत आहेत.2 / 10सध्या देशात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रीक गाड्यांची मागणी वाढत आहे. तसंच प्रदुषण कमी करण्यासाठी सरकारही इलेक्ट्रीक वाहन विकत घेण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहित करत आहे. तसंच ग्राहकांसाठी सरकारनंही काही योजना सुरू केल्या आहेत. 3 / 10भारतात पुढील वर्षभरात इलेक्ट्रीक गाड्यांच्या (Electric Vehicles) विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. ईव्हायई या कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार भारतात जवळपास ९० टक्के ग्राहक इलेक्ट्रीक वाहन खरेदी करण्यासाठी अधिक खर्च करण्यासही तयार आहेत. 4 / 10EYE च्या मोबिलिटी कंझ्युमर इंडेक्स (MCI) सर्वेक्षणात १३ देसांच्या ९ हजारांपेक्षा अधिक ग्राहकांची प्रतिक्रिया घेतली गेली. यामध्ये भारतातील १ हजारांपेक्षा लोकांचं मत जाणू घेण्यात आलं.5 / 10हे सर्वेक्षण जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात करण्यात आलं. या सर्वेक्षणात ४० टक्के ग्राहकांनी आपण इलेक्ट्रीक वाहन खरेदी करण्यासाठी अन्य वाहनांच्या तुलनेत २० टक्के अधिक खर्च करण्यास तयार असल्याचं म्हटलं. 6 / 10सर्वेक्षणानुसार भारतात १० पैकी ३ ग्राहकांनी ते इलेक्ट्रीक किंवा हायड्रोजन कार घेणं पसंत करत असल्याचंही सांगितलं. 7 / 10सर्वेक्षणानुसार भारतीयांनी नोंदवलेल्या मताप्रमाणे अधिक भारतीय ग्राहकांच्या म्हणण्यानुसार त्यांची पसंती एका चार्जमध्ये गाडी १०० ते २०० मैलांपर्यंत चालण्यास अधिक पसंती आहे.8 / 10तर दुसरीकडे ९० टक्के ग्राहक इलेक्ट्रीक वाहन खरेदी करण्यासाठी अधिक खर्चही करण्यास तयार आहेत. 9 / 10यापैकी ४० टक्के ग्राहक हे या वाहनांसाठी २० टक्के अधिक खर्च करण्यास तयार असल्याचं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. 10 / 10सध्या आणि भविष्यात इलेक्ट्रीक वाहनांचे मालक डिजिटल चॅनलला अधइक पसंती देण्यास प्राधान्य देत असल्याचं म्हणत आहेत.