शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

35 KM मायलेज अन् 6 एअरबॅग्स; लवकरच येणार Maruti च्या 'या' कारचे Hybrid व्हर्जन, किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 15:45 IST

1 / 7
Maruti Suzuki लवकरच भारतात आपल्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट SUV Maruti Fronx चे नवे स्ट्रॉंग हायब्रिड व्हर्जन आणण्याच्या तयारीत आहे. Maruti Fronx Hybrid ला 2027 मध्ये लॉन्च केले जाऊ शकते. गेल्या काही महिन्यांत ही कार टेस्टिंगदरम्यान अनेकदा दिसली असून, इंधन कार्यक्षमता आणि प्रीमियम फीचर्समुळे ती मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी आकर्षक ठरण्याची शक्यता आहे.
2 / 7
Maruti Fronx Hybrid मध्ये कंपनीचे नवे 1.2-लिटर Z12E थ्री-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात येणार आहे. हे इंजिन स्ट्रॉंग हायब्रिड (Series Hybrid) सिस्टम सोबत काम करेल. पेट्रोल इंजिन बॅटरी चार्ज करेल आणि इलेक्ट्रिक मोटर थेट चाकांना शक्ती देईल.
3 / 7
Maruti Fronx Hybrid मध्ये कंपनीचे नवे 1.2-लिटर Z12E थ्री-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात येणार आहे. हे इंजिन स्ट्रॉंग हायब्रिड (Series Hybrid) सिस्टम सोबत काम करेल. पेट्रोल इंजिन बॅटरी चार्ज करेल आणि इलेक्ट्रिक मोटर थेट चाकांना शक्ती देईल.
4 / 7
संभाव्य किंमत किती? हायब्रिड टेक्नॉलॉजीमुळे Fronx Hybrid ची किंमत सध्याच्या पेट्रोल मॉडेलपेक्षा ₹2 ते ₹2.5 लाखांनी जास्त असू शकते. सध्याची Fronx किंमत: ₹7.59 लाख ते ₹12.95 लाख (एक्स-शोरूम) असून, अपेक्षित Fronx Hybrid किंमत: ₹8 लाख ते ₹15 लाख (एक्स-शोरूम) असू शकते. या किमतीत ही SUV बजेट-फ्रेंडली हायब्रिड पर्याय ठरू शकते.
5 / 7
Maruti Fronx Hybrid मध्ये आधुनिक आणि प्रीमियम फीचर्स देण्यात येण्याची शक्यता आहे, त्यात 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, हेड-अप डिस्प्ले (HUD), 360-डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जिंग, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, सनरूफ आणि टॉप व्हेरिएंटमध्ये Level-1 ADAS देण्याचीही शक्यता आहे. यामुळे ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होईल.
6 / 7
मारुती आपल्या सेफ्टी पॅकेजवर भर देत असून, Fronx Hybrid मध्ये 6 एअरबॅग्स (स्टँडर्ड), ABS सह EBD, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), हिल होल्ड असिस्ट, रिव्हर्स पार्किंग सेन्सर व कॅमेरा, ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) सारखे फीचर्स मिळतील.
7 / 7
उच्च मायलेज, आधुनिक हायब्रिड टेक्नॉलॉजी, प्रीमियम फीचर्स आणि मारुतीची विश्वासार्हता...या सगळ्यांमुळे Maruti Fronx Hybrid ही भारतातील हायब्रिड SUV सेगमेंटमध्ये मोठी गेम-चेंजर ठरू शकते. 2027 मध्ये लॉन्च झाल्यास, ती मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी एक मजबूत आणि किफायतशीर पर्याय ठरण्याची शक्यता आहे.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीcarकारAutomobile Industryवाहन उद्योग