शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Kia Seltos Facelift: एकच नंबर! Kia Seltos चं फेसलिफ्ट व्हर्जन...सर्वांची बोलती बंद; भारी लूक, फिचर्स अन् किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 9:18 AM

1 / 9
किया कंपनीच्या सर्वाधिक विक्री पैकी एक असलेल्या सेल्टॉस एसयूव्ही कारचं फेसलिफ्ट व्हर्जन लवकरच भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. सेल्टॉसच्या फेसलिफ्ट व्हर्जनचे लूक्स लिक झाले आहेत.
2 / 9
आकर्षक लूक, भरभरुन फिचर्स हा हातखंडा आजमावत किया कंपनीनं भारतीय बाजारपेठेत सेल्टॉस कारला लॉन्च केलं आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यानंतर आता पुन्हा एकदा सेल्टॉसची लोकप्रियता पाहून कंपनीनं कारचं फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च करण्याची तयारी केली आहे.
3 / 9
सेल्टॉस कार भारतीय बाजारपेठेत यशस्वी ठरल्यानंतर इतरही देशात कंपनीनं या कारचं लॉन्चिंग केलं आणि चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे. आता या कारला मारुती सुझूकी, हायरायडर आणि ग्रँड विटारा यासारख्या प्रतिस्पर्धी कारकडून हायब्रिड इंजिनच्या जोरावर टक्कर देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
4 / 9
किया सेल्टॉसच्या फेसलिफ्ट व्हर्जनची चाचणी भारतासह युरोपमध्येही केली जात असल्याचं दिसून आलं आहे. भारत आणि युरोपातील रस्त्यांवर कार स्पॉट झाली आहे. आता स्वत: कंपनीनंच सेल्टॉसच्या फेसलिफ्ट व्हर्जनचा लूक रिव्हील केला आहे. कंपनीनं सर्वात आधी दक्षिण कोरियामध्ये याचं फेसलिफ्ट व्हर्जन समोर आणलं आहे.
5 / 9
सेल्टॉसच्या फेसलिफ्टमध्ये कारच्या लूकमध्ये लक्षवेधी बदल करण्यात आल्याचं पाहायला मिळतं. कारचा फ्रंट लूक आणखी दमदार करण्यात आला आहे. तसंच LED हेडलॅम्पच्या डिझाइनमध्येही बदल करण्यात आले आहेत. नवी टायगर नोज ग्रिल डिझाइन पाहायला मिळते.
6 / 9
फ्रंट लूकचा फॉग लॅम्पचा भाग देखील एलईडी लाइट्सनं कव्हर केलेला पाहायला मिळतो. त्यामुळे कार समोरून पाहताच एक मजबूत कारचा लूक देईल इतकं नक्की. तशी काळजी डिझाइनमध्ये घेण्यात आल्याचं पाहायला मिळतं.
7 / 9
फेसलिफ्टमध्ये इन्स्ट्रूमेंट क्लस्टर पूर्णपणे डिजिटल स्वरुपात असेल. तसंच फेसलिफ्ट व्हर्जनच्या स्टँडर्ड व्हर्जनपासूनच ६ एअरबॅग्ज मिळणार आहेत. तसंच कार ड्युअल टोन रंगातही उपलब्ध होणार आहे. कारमध्ये 1.5L नॅचरली अॅस्परेटेड इंजिन जे 113bhp आणि 144Nm पावर जनरेट करेल.
8 / 9
कारमध्ये ६ स्पीड मॅन्युअल, ६ स्पीड iMT किंवा CVT उपलब्ध असणार आहे. तसंच सेल्टॉसचं फेसलिफ्ट व्हर्जन 1.4L टर्बो पेट्रोल इंजिन पर्यायात देखील उपलब्ध होऊ शकतं.
9 / 9
सेल्टॉस कारची भारतीय बाजारपेठेत ह्युंदाई क्रेटा, VW टायगून, स्कोडा कुशाक, एमजी एस्टॉर आणि आगामी मारुती ग्रँड विटारा आणि टोयोटा हायराडर यांच्याशी स्पर्धा आहे. त्यामुळे सेल्टॉसचं फेसलिफ्ट व्हर्जन भारतीय किती पसंती देतात हे कार लॉन्च झाल्यानंतरच कळेल.
टॅग्स :Kia Motars Carsकिया मोटर्सAutomobile Industryवाहन उद्योग