साप्ताहिक राशीभविष्य: कुठलाही ग्रहपालट नाही तरी संमिश्र ग्रहमान राहील; परीक्षांचे निकाल लागतील मनासारखे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 11:00 IST
1 / 13दि. ३ ते ९ ऑगस्ट २०२५ या सप्ताहात कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी- हर्षल वृषभराशीत, गुरू आणि शुक्र मिथुन राशीत, रवी आणि बुध कर्क राशीत, केतू सिंह राशीत, मंगळ कन्या राशीत, प्लूटो मकर राशीत, राहू कुंभ राशीत, तर शनी आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. चंद्राचे भ्रमण वृश्चिक, धनू, मकर आणि कुंभ या राशींमधून राहील.2 / 13बदलाचे वारे वाहू लागतील: सप्ताहाची सुरुवात थोडी दगदगीने होईल. कामाचा ताण राहील. घाई न करता शांतपणे कामे करा. वेळेचे नियोजन नीट करा. इतरांच्या भानगडीत न पडता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. मंगळवारपासून परिस्थिती आटोक्यात येईल. एखादी उत्साह वाढवणारी घटना घडेल. सामाजिक मानसन्मान मिळेल. नवीन ओळखी होतील. चांगले मार्गदर्शन मिळेल. कार्यक्षेत्रात बदलाचे वारे वाहू लागेल. फार खळखळ न करता सकारात्मक विचार करा आणि संधीचा फायदा घ्या. टीप- बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.3 / 13मोहात अडकू नका : कार्यक्षेत्रात तुमचे वर्चस्व राहील. मात्र, कामात जास्त वेळ द्यावा लागेल. सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या मनात उत्साह राहील. मात्र, कुणी तुम्हाला मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करेल. त्या दृष्टीने रविवार, सोमवार थोडी खबरदारी घ्या. हुरळून जाऊन निर्णय घेऊ नका. जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. मंगळवार, बुधवार, गुरुवार वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. शुक्रवारपासून परिस्थिती नियंत्रणात येईल. अनेक अडचणी आपोआप दूर होतील. टीप- रविवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.4 / 13संमिश्र ग्रहमान राहील: या सप्ताहात आपल्याला संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. विरोधकांच्या हातात आयतेच कोलीत मिळेल, अशी कामे करू नका. त्या दृष्टीने रविवार, सोमवार थोडे सावध राहा. तुमच्या योजना लोकांना सांगत बसू नका. तब्येतीची काळजी घ्या. मंगळवारपासून अनुकूल ग्रहमानाचा अनुभव येईल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू प्राप्त होईल, व्यवसायात भरभराट होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. अचानक धनलाभ होईल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.5 / 13मानसन्मान मिळेल : सप्ताहाचा मधला टप्पा सोडता इतर सगळा काळ अनुकूल वातावरण राहील. सुरुवातीला तुमच्या महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. परीक्षांचे निकाल मनासारखे लागतील. मानसन्मान मिळेल. बुधवार, गुरुवार खाण्यापिण्याची बंधने पाळा. आरोग्याची काळजी घ्या. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. शुक्रवार, शनिवार तुमच्या समोर असलेल्या किरकोळ स्वरूपाच्या अडचणी दूर होतील. प्रेमात असणाऱ्यांना भेटवस्तू मिळतील. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.6 / 13कार्यक्षेत्रात बदल होतील कार्यक्षेत्रात अचानक काही बदल होऊ शकतात. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. व्यवहार करताना खबरदारी घ्या. कागदपत्रे नीट वाचून घ्या. घरी पाहुणे मंडळी येतील. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. काहींना जवळच्या प्रवासाचा योग येईल. तुमच्या कामाची लोकांकडून प्रशंसा केली जाईल. प्रसिद्धी मिळेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. शुक्रवार, शनिवार आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या काही योजना थोड्या गुप्त ठेवणेच चांगले राहील. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.7 / 13क्रोधाला आवर घाला : ग्रहमानाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. मात्र, काही ताणतणाव असतील. थोडे संयमाने आणि मुत्सद्दीपणाने वागून आपली कामे करून घ्या. क्रोधाला आवर घातला पाहिजे. जीवनसाथीशी वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. मात्र, सुरुवातीला गुंतवणूक करताना काळजी घ्या. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. अधिकारी वर्गाचे चांगले सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होतील. टीप- रविवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.8 / 13मोठी जबाबदारी राहील: एखाद्या चांगल्या घटनेने आठवड्याची तूळ सुरुवात होईल. मनात सकारात्मक विचार राहतील. कार्यक्षेत्रात तुमचा दबदबा राहील. अधिकारी वर्गाचे चांगले सहकार्य मिळेल. काहींना मोठी जबाबदारी मिळेल. कामातील बदल तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. भावंडांशी सख्य राहील. जवळचे प्रवास होतील. व्यावसायिक गुंतवणूक जपून करा. घरातील कामांसाठी वेळ द्यावा लागेल. जवळच्या लोकांशी संवाद ठेवा. आवडत्या छंदासाठी वेळ द्या. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.9 / 13मोहात अडकू नका : काही फायदे, तर काही तोटेही होतील. यश मिळत असताना थोडे जमिनीवर पाय ठेवल्यास काही अडचणी राहणार नाहीत. सुरुवातीला कुणी तुम्हाला मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करेल. थोडे सावध राहा. समोरच्या व्यक्तीचे छुपे इरादे ओळखा, जीवनसाथीशी वाद टाळा. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. खाण्यापिण्याची चंगळ राहील, जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. भावंडांशी गैरसमज होतील. प्रवासात सतर्क राहा. कागदपत्रे, मूल्यवान वस्तू सांभाळा. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, गुरुवार चांगले दिवस.10 / 13अनुकूल फळे मिळतील : या सप्ताहात आपल्याला अनुकूल फळे मिळतील. मात्र, सुरुवातीचे दोन दिवस सावधपणे वागण्याची गरज आहे. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका, अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. मंगळवारपासून परिस्थिती तुमच्या आटोक्यात येईल. सकारात्मक परिणाम दिसून येतील. जीवनसाथीशी सूर जुळतील. विवाहेच्छुकांसाठी अनुकूल काळ आहे. चांगल्या स्थळांचे प्रस्ताव समोर येतील, व्यवसायात भरभराट होईल. कार्यक्षेत्रात कामाचा थोडा ताण राहील. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.11 / 13संमिश्र ग्रहमान राहील : संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. सप्ताहाची सुरुवात उत्साहात होईल. एखाद्या चांगल्या बातमीमुळे मन आनंदून जाईल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. मात्र, हाती आलेला पैसा खर्च करण्याकडे कल राहील. त्या दृष्टीने मंगळवारपासून थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. नको त्या भानगडीत पडू नका. कायद्याची बंधने पाळा. आर्थिक देवाणघेवाण जपून करा. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. कुणाला न मागता मदत किंवा सल्ला देऊ नका. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.12 / 13धनलाभ होईल : कार्यक्षेत्रात काही अनपेक्षित बदल होऊ शकतात. त्यामुळे तुमचा कामाचा ताण वाढेल. वेळेचे नियोजन नीट केले तर हळूहळू सगळी कामे आटोक्यात येतील. सहकारी वर्गाशी जुळवून घेणे योग्य ठरेल. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. मंगळवारपासून अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात फायदा होईल. हाती घेतलेले प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण कराल. भेटवस्तू प्राप्त होतील. शुक्रवार, शनिवार सबुरीने वागण्याची गरज आहे. स्वतःहून अंगावर कामे ओढवून घेऊ नका. नाही तर आपलीच कामे मागे पडतील. टीप- रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.13 / 13उत्साहवर्धक काळ : चंद्राचे भाग्य स्थानापासून ते लाभ स्थानापर्यंत होणारे भ्रमण शुभ फळे देणारे ठरेल. सुरुवातीला एखादी चांगली बातमी कळेल. त्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. नोकरीत तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. भेटीगाठी फलद्रूप होतील. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.