By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 13:12 IST
1 / 6भविष्यात काय होईल, याबद्दल प्रत्येकाच्याच मनात धाकधूक, कुतूहल असते. अनेकजण त्याबद्दल ज्योतिषाकडून जाणूनही घेतात. जगभरात भविष्य सांगणारी अनेक प्रसिद्ध लोक आहेत, यात एक होऊन गेल्या आहेत, बाबा वेंगा. बुल्गारियाच्या बाबा वेंगाची काही बाबतीत भविष्यवाणी खरी ठरली आहे.2 / 6बाबा वेंगाने ६३ वर्षांनंतर जगावर येणाऱ्या एका संकटाबद्दलची भविष्यवाणी करून ठेवली आहे. ही भविष्यवाणी कोरोनासारख्या व्हायरसबद्दलची आहे. 3 / 6बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार, ६३ वर्षानंतर म्हणजे २०८८ मध्ये पृथ्वीवर असा एक व्हायरस अर्थात विषाणू येईल, ज्याबद्दल आजपर्यंत कुणालाच माहिती नाही.4 / 6या विषाणूचा संसर्ग झाला, तर तो व्यक्ती लवकर वृद्ध होईल. म्हणजे कमी वयातच माणूस म्हातारा दिसायला लागेल. त्याचबरोबर कमी वय असतानाच लोक मृत्यूकडे लवकर जायला लागतील.5 / 6बाबा वेंगाची ही भविष्यावाणी आजपासून ६ दशकानंतरची आहे. पण, कोरोना व्हायरसप्रमाणेच असा विषाणू आला तर मानव जातीसमोर सगळ्यात मोठं संकट निर्माण होऊ शकतं.6 / 6गेल्या काही वर्षात पर्यावरणातील बदल, प्रयोगशाळांमध्ये तयार केले जाणारे घातक व्हायरस, जैविक युद्ध (बॉयोलॉजिकल वार) उद्भवू शकतात. बाबा वेंगाने केलेल्या काही भविष्यवाणीपैकी काही गोष्टी खऱ्या ठरल्या आहेत.