शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 9:18 PM

1 / 5
अहमदनगर जिल्ह्यात रानफुलांसाठी व फुलपाखरांसाठी समृद्ध आहे.
2 / 5
जैवविविधता वाढविण्याच्या उद्देशाने निसर्ग अभ्यासक तथा शिक्षक जयराम सातपुते यांच्यासह २२ निरीक्षकांनी सलग रानफुलांचे व फुलपाखरांचे संपूर्ण जिल्हाभर फिरून सर्वेक्षण केले.
3 / 5
जिल्हाभरात जवळ जवळ ९८ प्रजातींच्या आकर्षक व वैशिष्ट्यपूर्ण पावसाळी रानफुलांच्या प्रजातींची तर सुमारे ३२ प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद छायाचिञणासह घेतली आहे.
4 / 5
भंडारदरा, हरिश्चंद्रगड ही ठिकाणे वैविध्यपूर्ण प्रजातींची रानफुले व फुलपाखरांसाठी अतिशय वैभव संपन्न असल्याचे आढळून आले.
5 / 5
तर पेमगिरी, विळदघाट, वृद्धेश्वर, करंजीघाट, मोहटे, मुळा व जायकवाडी धरण परिसर, आगडगाव, डोंगरगण, गर्भगिरी ठिकाणीही रानफुलांची वैविध्यता दिसून आली.