स्वच्छतेच्या ध्यासातून जन्मलेली महाराष्ट्रातील जुनी संस्था; ब्रिटिश काळात झालेली 'अहमदनगर' नगरपालिकेची स्थापना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 17:43 IST
1 / 7अनेक मोठ्या शहरांच्या तुलनेत अहिल्यानगरचे नागरी प्रशासन किती जुने आहे, याचा पुरावा म्हणजे या नगरपालिकेची १८५४ मध्ये झालेली स्थापना. या ऐतिहासिक प्रवासाला तब्बल १६६ वर्षे पूर्ण झाली आहेत.2 / 7ब्रिटीश सरकारने १८५० मध्ये 'गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट २६' अन्वये स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन करण्याचा कायदा केला होता. या कायद्याचा आधार घेत अहमदनगरच्या जागरूक नागरिकांनी ब्रिटीश सरकारकडे एक अर्ज केला होता. 3 / 7शहराची साफसफाई, रस्त्यांची डागडुजी, गटारींची स्वच्छता आणि सार्वजनिक उपद्रव नष्ट करण्यासाठी नगरपालिका असावी, अशी मागणी या अर्जात करण्यात आली होती.4 / 7नागरिकांच्या मागणीवर सरकारने १२ जुलै १८५४ रोजी जाहीरनामा प्रसिद्ध करून हरकती मागवल्या. अखेर ११ सप्टेंबर १८५४ रोजी नागरिकांनी मॅजिस्ट्रेटसमोर पालिकेच्या कामाचा आराखडा लिहून दिला. 5 / 7यानंतर सरकारने १० ऑक्टोबर १८५४ रोजी अधिकृत आदेश काढून नगरपालिका स्थापन केली. ही सर्व माहिती येथील ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयात आणि 'शतसंवत्सरी' ग्रंथात आजही जपून ठेवण्यात आली आहे.6 / 7सुरुवातीच्या काळात पालिकेचा मुख्य उद्देश केवळ शहराची स्वच्छता हाच होता. त्यासाठी नागरिकांकडून 'टाऊन ड्युटी' म्हणजेच नगर कर वसूल केला जात असे. या करातून जमा होणाऱ्या रकमेतून कर्मचाऱ्यांचे पगार आणि शहराची डागडुजी केली जात असे.7 / 7नगरपालिकेच्या कारभारात अनेक नामवंत व्यक्तींनी आपले योगदान दिले आहे. १८८९ पासून अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी या पालिकेचे अध्यक्षपद भूषवले.