अक्षय्य तृतीयेला सुखसमृद्धीसाठी 'या' ५ गोष्टी करा दान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 11:55 IST
1 / 6वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात. शास्त्रानूसार साडे तीन मुहूर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेला सोनं, गाडी किंवा कपड्यांची खरेदी केल्यास शुभ संकेत मानले जातात. तसंच या दिवशी दान केल्यास विविध संकटातून मुक्तता होते, असंही मानलं जातं. 2 / 6१) अक्षय्य तृतीयेला थंड पदार्थांचं दान करावं. फळे, वस्तू किंवा कोणताही थंड पदार्थ दान करणे शुभ मानलं जातं.3 / 6२) अक्षय्य तृतीयेला भाग्योदय होण्यासाठी शंखाची खरेदी करा. त्यामुळे लक्ष्मी आणि विष्णू प्रसन्न होतात, असं म्हटलं जातं4 / 6३) अक्षय्य तृतीयेला तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करत असाल, तर पूजा करून त्या वस्तू वापराव्या किंवा तिजोरीत ठेवाव्या. 5 / 6४) ११ वर्षांनी अक्षय्य तृतीयेला २४ तासाचा सर्वाथसिद्दीचा महासंयोग होतोय. म्हणून या दिवशी प्राण्यांना खाऊ घातल्यास वैयक्तिक व पारिवारिक आयुष्यात सुख मिळू शकतं6 / 6५) अक्षय्य तृतीयेला अन्नदान, जलदान किंवा वस्त्रदान करा. मानसिक व्याधींपासून आराम मिळू शकतो.