शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांसाठी महायुतीचा 'वचननामा' जाहीर; ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत, महिलांसाठी BESTचे अर्धे तिकीट अन् बरंच काही!
2
इंडियन आयडल-3 चा विजेता प्रशांत तमांग काळाच्या पडद्याआड; वयाच्या 43व्या घेतला अखेरचा श्वास
3
"एक मंत्री आहे, नेपाळ्यासारखा...", नितेश राणेंवर टीका करताना अबू आझमींची जीभ घसरली
4
महायुतीचा वचननामा: मुंबई लोकल अन् मेट्रोचा प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी जाहीरनाम्यात काय?
5
“काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवू शकत नाहीत”: CM फडणवीस
6
“भारत देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा, आपल्या इतिहासाचा प्रतिशोध घ्यायचा आहे”: अजित डोवाल
7
बनावट कोर्ट, खोटे न्यायाधीश आणि १५ कोटींचा गंडा; निवृत्त डॉक्टर दाम्पत्यासोबत मोठा फ्रॉड!
8
‘गझनीपासून औरंगजेबापर्यंत इतिहासात गडप झाले, पण सोमनाथ…’, मोदींचं मोठं विधान
9
BMC Election 2026: ...तर १६ तारखेनंतर 'जय श्रीराम' म्हणता येणार नाही; नितेश राणेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल!
10
"उगाच अभिषेकचं नाव कशाला घेता?"; तेजस्वी घोसाळकरांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
11
११ लाखांची पैज! संजय राऊतांचे CM फडणवीसांना ओपन चॅलेंज; म्हणाले, “हिंमत दाखवा अन्...”
12
Exclusive: महेश मांजरेकरांकडून अमित ठाकरेंना होती 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाची ऑफर, स्वत:च केला खुलासा
13
इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; आंदोलकांना थेट मृत्युदंडाचा इशारा
14
महिलांना आत्मनिर्भर करणारी योजना! ४,४५० रुपयांच्या योजनेवर मिळवा १६ लाखांचा निधी
15
IND vs NZ 1st ODI Live Streaming : रोहित-विराट पुन्हा मैदानात उतरणार; कोण ठरणार सगळ्यात भारी?
16
“काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत परिवर्तन घडवा”: एकनाथ शिंदे
17
चक्क साडी नेसून मैदानात उतरल्या महिला; फुटबॉल सामन्याचा व्हिडिओ इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ!
18
SBI एटीएम व्यवहारांच्या शुल्कात वाढ; सॅलरी अकाउंटसाठी 'अनलिमिटेड' फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा बंद
19
पूजा खेडेकरला बांधून ठेवलं, आई-वडिलांना गुंगीचं औषध दिलं, अन…, नोकरानेच केली घरात चोरी
20
IND vs NZ 1st ODI : नव्या वर्षात टीम इंडियासाठी 'शुभ' संकेत! डावखुऱ्या हाताने नाणे उंचावत गिल ठरला 'उजवा' अन्...
Daily Top 2Weekly Top 5

ZP शिक्षकाच्या मुलाची UPSC परीक्षेत भरारी; सेल्फस्टडी करत पहिल्याच प्रयत्नात मिळवले यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 15:16 IST

२०२० मध्ये आलेल्या कोरोनाच्या साथीत वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना आलेल्या अनुभवातून डाॅ.पवनने प्रशासकीय सेवेत जाण्याच्या निश्चय केला. 

- मोहन बोराडे सेलू  (परभणी): कठोर परिश्रम, वेळेचे अचूक नियोजन, प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर डॉ. पवन रंगनाथ खेडकर या एका जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाच्या मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे. शहरातील सर्वोदय नगरमध्ये राहणारे जिपचे सेवानिवृत्त शिक्षक रंगनाथ खेडकर यांचा पवन धाकटा मुलगा असून त्याच्या यशाने सेलूच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. 

डाॅ. पवनचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शहरातील नूतन शाळा व महाविद्यालयात झाले. तर मुंबई येथील जेजे वैद्यकीय काॅलजेमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयात वैद्यकीय सेवेत रूजू झाला. २०२० मध्ये आलेल्या कोरोनाच्या साथीत वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना आलेल्या अनुभवातून डाॅ.पवनने प्रशासकीय सेवेत जाण्याच्या निश्चय केला. 

त्यानंतर वैद्यकीय सेवा, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून डॉ. पवनने युपीएससी परिक्षेची तयारी सुरू केली. विशेष म्हणजे, क्लास न लावता. सेल्फ स्टडी आणि ऑनलाईनवर साहित्य यावर त्याने यशाचे शिखर गाठले. पवनने २०२१ मध्ये युपीएससीची परिक्षा दिली होती. त्यानंतर तो प्रतीक्षा यादीत ६० क्रमांकावर होता. मंगळवारी जाहीर झालेल्या प्रतिक्षा यादीतील निकालात त्याची अखेर निवड झाली. 

यशामागे आई-वडिलांची प्रेरणाआई-वडिलांचे संस्कार, शिस्त यामुळे हे यश मिळू शकले. मराठवाडय़ातील विद्यार्थांकडे चांगली गुणवत्ता आणि क्षमता आहे. त्यामुळे या भागातून सर्वाधिक डाॅक्टर, इंजिनिअर होतात. माञ स्पर्धा परीक्षेसंदर्भात आपल्याकडे जागृती नाही. गुणवता असलीतरी त्याची जाणीव कमी असल्यामुळे युपीएससीकडे कल कमी आहे. इतर क्षेत्रापेक्षा प्रशासकीय सेवेतून अधिक चांगल्या प्रकाराने सेवा करता येते. लोकांना न्याय देता येतो. - डॉ. पवन खेडकर