शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

येलदरी प्रकल्पात ६८ टक्के पाणीसाठा शिल्लक; योग्य नियोजन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 18:30 IST

मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने यावर्षी पाण्याची टंचाई कमी झाली आहे.

ठळक मुद्देयेलदरी प्रकल्पाच्या पाण्यावर परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील सुमारे ३०० ते ३५० योजना चालवल्या जातात.

परभणी : जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील प्रकल्पात केवळ ६८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रकल्पाच्या साठ्यातून उन्हाळी हंगामातील सिंचन आणि अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा लागणार आहे. त्यामुळे या प्रकल्पातीेल पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने यावर्षी पाण्याची टंचाई कमी झाली आहे. मागील वर्षी येलदरी प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा होता. मात्र, रब्बी आणि खरीप हंगामासाठी या प्रकल्पातील पाणी सोडण्यात आले. त्यानंतर २२ एप्रिल रोजी या प्रकल्पात ५५०.३०० दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी ६८ टक्के एवढी आहे. विशेष म्हणजे, येत्या दोन-चार दिवसांत या प्रकल्पातील पाणी उन्हाळी हंगामासाठी सोडले जाणार आहे. त्यामुळे आणखी पाणीसाठा घटण्याची शक्यता आहे.

येलदरी प्रकल्पाच्या पाण्यावर परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील सुमारे ३०० ते ३५० योजना चालवल्या जातात. या योजनांसाठीही येलदरी प्रकल्पातून पाणी द्यावे लागणार आहे. सध्या अनेक भागात भूजल पातळी कमी झाल्याने प्रकल्पाच्या पाण्यावरच या गावांची भिस्त आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे.

सिद्धेश्वर प्रकल्प कोरडाठाकयेलदरी धरणाच्या खालच्या बाजूला असलेला हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर प्रकल्प मात्र कोरडाठाक आहे. या प्रकल्पाची एकूण पाणी साठवणक्षमता ५.३ टीएमसी आहे; परंतु प्रत्यक्षात प्रकल्पामध्ये जिवंत पाणीसाठाच शिल्लक नाही. त्यामुळे या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना सुरू ठेवण्यासाठी येलदरी प्रकल्पातून पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे येलदरी प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट होण्याची चिन्हे आहेत. 

टॅग्स :WaterपाणीFarmerशेतकरीparabhaniपरभणी