शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरकारसोबत अनेक वर्षांपासूनचा झगडा; मरेन पण, समाजाशी गद्दारी नाही: मनोज जरांगे

By ज्ञानेश्वर भाले | Updated: October 2, 2023 18:12 IST

अनेक अडचणी आल्या, मात्र समाजाच्या प्रश्नांसाठी मी यंत्रणांना भांडत राहिलो.

परभणी : मराठा समाजाचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत असून त्यांना न्याय देण्यासाठी समाजाला कुणबी म्हणून गणले जाणे महत्त्वाचे आहेत. आंतरवालीतील आंदोलनानंतर नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. परंतु तो अर्धवट असून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, असे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी केले. ते सोमवारी दुपारी परभणीत झालेल्या सभेत बोलत होते.

मराठा समाजाची स्थिती बघता त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची गरज असून कुणबी प्रमाणपत्र द्यायला हवे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत लढा उभारला होता. यादरम्यान सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घेत समाजाला न्याय देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांसह बहुतांश मंत्र्यांनी आंदोलनस्थळी येऊन त्यांना दिले होते. त्यानंतर सरकारने निर्णय घेत ज्यांच्याकडे निजामकालीन नोंदी आहे, त्यांनाच प्रमाणपत्र देण्यात येईल असे धोरण आखले. परंतु या निर्णयामुळे मराठा समाजाचे प्रश्न सुटणार नसून समाजाला अर्धवट नाही तर सरसकटच कुणबी असल्याचे प्रमाणपत्रावर जरांगे पाटील ठाम होते. त्यामुळे सरकारने यासाठी पुरावे गोळा करण्यासाठी एका महिन्याची मुदत मागवली होती. यावर जरांगे पाटील यांनी अजून दहा दिवसाचा कालावधी दिला होता. संबंधित मुदत संपत आली असून समाधानकारक निर्णय झाला नाही तर १४ ऑक्टोंबरला आंतरवालीत सभा घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. 

आणखी किती पुरावे हवेतआंतरवालीतील आंदोलनानंतर सरकारने त्याची दखल घेत मराठवाड्यातील मराठा समाजाला न्याय देण्यासाठी जिल्हानिहाय प्रशासकीय यंत्रणांना कळविण्यात आले होते. त्यानुसार मराठवाड्यातील शासकीय दस्तावेजांची तपासणी करून कुणबी समाजाच्या नोंदी असणाऱ्या विविध कागदपत्रांचा अहवाल एकत्रित करून सरकारला देण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने मराठवाड्यात मराठा समाजाच्या कागदपत्रांवर शेकडो ठिकाणी कुणबी असल्याच्या नोंदी पुढे आल्या आहे. त्यामुळे सरकारला आणखी किती पुरावे हवेत, असा प्रश्न यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

अंतरवालीत राज्यव्यापी सभासरकारने मराठा समाजाला कुणबीचे म्हणून प्रमाणपत्र देण्यासाठी एका महिन्याची मुदत मागितली होती. यानंतर आणखी दहा दिवस त्यांना वाढवून देण्यात आले. परंतु ती मुदत आता संपत आली आहे. आगामी काळात सकारात्मक निर्णय झाला नाही तर १४ ऑक्टोंबरला अंतरवाली सराटीत राज्यव्यापी सभा घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

मरेन पण, समाजाशी गद्दारी नाहीमी कित्येक वर्षापासून मराठा समाजाच्या प्रश्नासाठी सरकारशी झगडत आहे. यादरम्यान अनेक अडचणी आल्या, मात्र समाजाच्या प्रश्नांसाठी मी यंत्रणांना भांडत राहिलो. यादरम्यान अनेक अडचणी, प्रलाेभने आली पण त्यास कधीही बळी पडलो नाही. मी मरेन पण समाजाशी गद्दारी करणार नसल्याची भुमिका जरांगे पाटलांनी आपल्या भाषणात मांडली. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणparabhaniपरभणी