शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत वैद्यकीय महाविद्यालयासाठी महिलांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 00:27 IST

जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी २१ सप्टेंबर रोजी महिलांनी एकत्र येऊन येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. महिलांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्याला शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी २१ सप्टेंबर रोजी महिलांनी एकत्र येऊन येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. महिलांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.परभणीत शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय मंजूर करावे, या मागणीसाठी खा.बंडू जाधव यांनी ३ सप्टेंबरपासून जिल्ह्यात आंदोलन उभे केले आहे. या अंतर्गत ३ सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले. ११ सप्टेंबर रोजी याच मागणीसाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला होता. शुक्रवारी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी उचलून धरली. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात सकाळी ११ वाजेपासून महिला एकत्र येण्यास सुरुवात झाली. मोठ्या संख्येने जमलेल्या महिलांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी महापौर मीनाताई वरपूडकर, कॉ.माधुरी क्षीरसागर, डॉ.मीनाताई परतानी, डॉ.संध्याताई दुधगावकर, आधार कामगार युनियनच्या अनिता सरोदे, लायन्स क्लबच्या प्रभावती अन्नपूर्वे, हेमाताई रसाळ, श्रृती जोशी, वर्षा चव्हाण, सरोज देशपांडे, लताबाई परभणे, परिचारिका मेघना देशमुख, विमल काकडे, विद्यार्थिनी कोमल विश्वब्रह्मा, सुशिला निसर्गन आदींनी उपस्थित महिलांसमोर मनोगत व्यक्त केले.परभणी जिल्ह्यात कुठल्याही सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. येथील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सर्व सुविधा उपलब्ध असताना तसेच या ठिकाणी महापालिका अस्तित्वात असताना वैद्यकीय महाविद्यालयासाठी जाणून बुजून डावलले जात आहे. परभणीकरांना आंदोलनाशिवाय काहीच मिळत नाही. त्यामुळे हे महाविद्यालय मंजूर होईपर्यंत संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे महिलांनी यावेळी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊन त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली. महिला प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे यांना मागण्यांचे निवेदन दिले. या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.लढा तीव्र करणार : खा.बंडू जाधवयावेळी उपस्थित महिला आंदोलकांना मार्गदर्शन करताना खा.बंडू जाधव म्हणाले, परभणी येथे सर्व सुविधा असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जाणून बुजून डावलण्यात आले. परभणीसोबत महापालिका झालेल्या लातूर येथे खाजगी व शासकीय महाविद्यालय पूर्वीपासूनच आहे. चंद्रपूर येथे नव्याने वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आले. ब वर्ग नगरपालिका असताना उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले.परभणीला सर्व सुविधा आणि महापालिका असतानाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय का डावलले? असा सवाल करीत शासनाने त्याचा खुलासा करावा व वैद्यकीय महाविद्यालयास त्वरीत मंजुरी द्यावी. वैद्यकीय महाविद्यालय झाल्यास परभणीतील नागरिकांच्या आरोग्यासह शिक्षणाचाही प्रश्न निकाली निघणार आहे. त्यामुळे हे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करुन घेण्यासाठी उभारलेला हा लढा आणखी तीव्र करणार असल्याचे खा.बंडू जाधव यांनी सांगितले.महिला पोलिसांचा बंदोबस्तया आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाच्या वतीने महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांसह पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला अधिकारी, कर्मचाºयांची बंदोबस्तकामी नियुक्ती केली होती. पुरुष कर्मचाºयांपेक्षा महिला कर्मचाºयांची संख्या अधिक होती.घोषणांनी दणाणला परिसरदुपारी एक वाजण्याच्या सुमारास आंदोलनकर्त्या महिला जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर पोलिसांना त्यांना प्रवेशद्वाराजवळच अडविले. त्यानंतर महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘खा.बंडू जाधव तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालेच पाहिजे’, ‘महिला एकजुटीचा विजय असो’, ‘मिळत कसे नाही, मिळालेच पाहिजे’, ‘वैद्यकीय महाविद्यालय आमच्या हक्काचे...’ आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या.

टॅग्स :parabhaniपरभणीMedicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालयWomenमहिलाagitationआंदोलन