- विठ्ठल भिसेपाथरी: संपूर्ण पीक पाण्यात गेलं...शासन पंचनामा सुद्धा करत नाही , आता कस जगावं? अशी हताश हाक देत वडी येथील शेतकरी हनुमंत प्रभाकर तालडे (३५) यांनी मंगळवारी सकाळी 10 वाजता पाण्यात गेलेल्या शेतीकडे मोर्चा वळवला. गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेलं त्यांचं शेत पूरपाण्याने वेढलेलं होतं. शेती पाण्याखाली गेली, उरलेलं आयुष्य जगायचं कसं, या नैराश्यात ते थेट पुराच्या पाण्यातील आखाड्याकडे गेले.
या क्षणाचं हृदयद्रावक चित्र गावकऱ्यांनी मोबाईलवर टिपलं आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला. घटनेची माहिती सरपंच सिद्धू पाटील यांनी महसूल विभागाला दिली. त्यानंतर तीन तासांनी प्रशासन हललं आणि भारतीय सैन्याने बोटीच्या मदतीने हनुमंत यांना सुखरूप बाहेर काढलं.
अद्याप पंचनामाच नाही, मदत कुठे?हनुमंत तालडे हे अल्पभूधारक शेतकरी. त्यांच्याकडे फक्त दोन एकर स्वतःची शेती असून पाच एकर शेत त्यांनी ठोक्याने घेतलं होतं. प्रति एकर २५ हजार रुपये देऊन तब्बल सव्वा लाख रुपये भरले होते. मात्र पूराने सारे स्वप्न, सारी मेहनत, सर्व आशा पाण्यात गेली. “नुकसान झालं तरी शासन काही करत नाही. अजून पंचनामा झाला नाही, मग नुकसान भरपाई मिळणार कशी?” अशी व्यथा त्यांनी सैन्याच्या जवानांसमोर मांडली.
जबाबदारीच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरीघरात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील अशी पोटाची जबाबदारी आहे. शेत उद्ध्वस्त झालं, ठोक्याचे पैसे डोक्यावर आहेत, आणि पुढचा दिवस कसा उजाडणार याची चिंता. त्यामुळेच हनुमंत यांच्यासारखा तरुण शेतकरी नैराश्याच्या गर्तेत खेचला गेला.
शासनाचे डोळे कधी उघडणार?पूर हळूहळू ओसरतोय, पण शेतकऱ्यांच्या मनातला पूर अजूनही ओसरणार नाही. हनुमंत तालडे यांचं आयुष्य वाचलं, पण त्यांची स्वप्नं वाहून गेली. प्रश्न फक्त एवढाच आहे की, अशा शेतकऱ्यांच्या जखमा शासन खरंच भरून काढणार का? की या जखमा कायमस्वरूपी त्यांच्या आयुष्यात खोल ठसे उमटवत राहणार?
Web Summary : Burdened by crop loss and debt, a farmer attempted suicide in floodwaters. Prompt action by villagers and the army saved him. He lamented the lack of government assessment and compensation for his destroyed livelihood, leaving his family in dire straits.
Web Summary : फ़सल की बर्बादी और कर्ज से परेशान किसान ने बाढ़ में आत्महत्या का प्रयास किया। ग्रामीणों और सेना की त्वरित कार्रवाई से उसे बचाया गया। उसने सरकार द्वारा मूल्यांकन और मुआवजे की कमी पर दुख जताया, जिससे उसका परिवार गंभीर संकट में है।