तीन प्रकल्पांमध्ये ज्योत्याखाली पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:11 AM2021-03-29T04:11:49+5:302021-03-29T04:11:49+5:30

परभणी तालुक्यातील पेडगाव येथील प्रकल्पात दहा टक्के उपयुक्त जलसाठा आहे. सोनपेठ तालुक्यातील नखतवाडी येथील प्रकल्प कोरडाठाक आहे. त्याचप्रमाणे जिंतूर ...

Water under the flame in three projects | तीन प्रकल्पांमध्ये ज्योत्याखाली पाणी

तीन प्रकल्पांमध्ये ज्योत्याखाली पाणी

Next

परभणी तालुक्यातील पेडगाव येथील प्रकल्पात दहा टक्के उपयुक्त जलसाठा आहे. सोनपेठ तालुक्यातील नखतवाडी येथील प्रकल्प कोरडाठाक आहे. त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील केहाळ आणि भोसी या दोन्ही प्रकल्पांमध्ये पाणीसाठा शिल्लक नाही. इतर प्रकल्पांमध्येही अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यात गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव तलावात ६५ टक्के, टाकळवाडी तलावात ११ टक्के, कोद्री तलावात ३२ टक्के, पिंपळदरी ५३ टक्के, जिंतूर तालुक्यातील देगाव येथील तलावात १२ टक्के, जोगवाडा नऊ टक्के, बेलखेडा सात टक्के, वडाळी ३५ टक्के, चारठाणा ४५ टक्के, चिंचाली ८ टक्के, आडगाव १० टक्के, मांडवी तलावात नऊ टक्के आणि दहेगाव येथील तलावात १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

लघुप्रकल्पांमध्ये १२ दलघमी पाणी

जिल्ह्यात २२ लघु प्रकल्प असून, या प्रकल्पात ४५,८२७ दलघमी पाणी साठवण्याची क्षमता आहे. मात्र प्रत्यक्षात सध्या या प्रकल्पात केवळ १२.३१ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी २९ टक्के एवढी होते. विशेष म्हणजे मागील वर्षी मार्च महिन्यात या प्रकल्पांमध्ये एकूण ९.७५ दलघमी पाणीसाठा शिल्लक होता. त्याची टक्केवारी २३ टक्के एवढी होती. मागील वर्षाची तुलना करता यावर्षी फारसी समाधानक परिस्थिती नसल्याचे दिसत आहे.

Web Title: Water under the flame in three projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.