शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

गंगाखेड तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट गडद; तलावांनी गाठला हिवाळ्यातच तळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 18:19 IST

तालुक्यातील पाझर तलावांसह मासोळी प्रकल्पांनी हिवाळ्यातच तळ गाठला आहे. त्यामुळे या तलावावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. मासोळी प्रकल्पातून रब्बी हंगामातील सिंचनासाठीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देगंगाखेड तालुक्यामध्ये पुरेसा पाऊस झाला नाही.गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी साठवण तलावामध्ये आज घडीला १५.७९ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी या महिन्यामध्ये ९०.२५ टक्के पाणीसाठा होता.

गंगाखेड : तालुक्यातील पाझर तलावांसह मासोळी प्रकल्पांनी हिवाळ्यातच तळ गाठला आहे. त्यामुळे या तलावावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. मासोळी प्रकल्पातून रब्बी हंगामातील सिंचनासाठीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. 

गंगाखेड तालुक्यामध्ये पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे बहुतांश पाणीसाठे दरवर्षी प्रमाणे यावर्षी भरले नाहीत. गतवर्षीच्या पाणीसाठ्यामध्ये थोडी भर पडली असली तरी हिवाळ्यामध्येच बहुतांश तलाव व पाणी प्रकल्पातील साठा कमी झाला आहे. त्यामुळे भविष्यामध्ये पाणीटंचाईचे संकट ओढावण्याची शक्यता नाकारता येत नाही. गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी साठवण तलावामध्ये आज घडीला १५.७९ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी या महिन्यामध्ये ९०.२५ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये या तलावावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवली नाही. यावर्षी मात्र परिस्थिती वेगळी आहे.

राणीसावरगाव तलावामध्ये २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. टाकळवाडी तलावाने पूर्णपणे तळ गाठला आहे. गतवर्षी या तलावामध्ये ८३ टक्के पाणीसाठा होता. शिवाय कोद्री तलावही जोत्याखाली गेला आहे. गंगाखेड तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करणार्‍या  पालम तालुक्यातील तांदुळवाडी तलावही जोत्याखाली गेला आहे. सोनपेठ तालुक्यातील नखतवाडी तलावाचीही अशीच स्थिती आहे. या दोन्ही तलावात गतवर्षी अनुक्रमे ८३ व ७५ टक्के पाणीसाठा होता, अशी माहिती सिंचन शाखा २ चे कालवा निरिक्षक डी.एम. नागरगोजे यांनी दिली. 

गंगाखेड शहरासह माखणी, इसाद, पोखर्णी वाळके, चिलगरवाडी, खोकलेवाडी, सिरसम आदी गावांची तहान भागविणार्‍या मासोळी मध्यम प्रकल्पात केवळ १८ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये ८९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता, अशी माहिती मासोळी मध्यम प्रकल्पाच्या मोजणीदार एस.एस. मांगुळकर यांनी दिली.

सिंचनासाठीचा पाणीपुरवठा बंदयावर्षी पुरेसा पाऊस झाला नसल्याने हिवळ्यामध्येच तालुक्यातील तलावांनी तळ गाठला आहे. यामुळे मासोळी मध्यम प्रकल्पातून रब्बी हंगामातील सिंचनासाठी करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. तसेच मासोळी प्रकल्पातील मृत पाणीसाठ्यातून शहराला तसेच इतर गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जाईल. मार्चनंतर प्रकल्पात शिल्लक असलेला पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पुढील नियोजन केले जाणार असल्याचे प्रकल्पाचे शाखाधिकारी रामेश्वर उबाळे यांनी सांगितले. 

गोदावरी नदीवरील मुळी बंधार्‍याचे दरवाजे वाहून गेले आहेत. या बंधार्‍याला काही दरवाजे नसल्याने बंधार्‍यातही पाणीसाठा उपलब्ध नाही. सध्या बंधार्‍याची परिस्थिती बिकट झाली आहे. भविष्यात उद्भवणार्‍या तीव्र पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. 

टॅग्स :parabhaniपरभणी