शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

जायकवाडी वगळता मराठवाड्यातील जलप्रकल्प कोरडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 7:51 PM

जायकवाडी वगळता इतर प्रकल्पांची स्थिती वाईट

ठळक मुद्देमराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा

- अनुराग पोवळेपरभणी :  संपूर्ण राज्यातील प्रकल्प ओसंडून वाहत असताना मराठवाड्यात जायकवाडी प्रकल्प वगळता इतर सर्वच मोठे प्रकल्प कोरडेठाक आहेत. परिणामी, मराठवाड्यात औरंगाबाद वगळता इतर जिल्ह्यांत पिण्याच्या पाण्याची चिंता अद्याप मिटलेली नाही.

आॅगस्टचा पहिला आठवडा संपला असला तरी मराठवाड्यात पावसाने दमदार हजेरी लावली नाही. विदर्भालगतच्या किनवट, माहूर, हदगाव या तालुक्यात पाऊस झाला आहे. परभणी जिल्ह्यातही आज घडीला २९ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २३०.२८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यात ३८९.४१ मि.मी.अर्थात सरासरीच्या ४० टक्के पाऊस झाला आहे. मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पात आज घडीला नाशिक जिल्ह्यातील धरणामधून पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. त्यामुळे मृतसाठ्यात गेलेल्या जायकवाडीत जवळपास १५  टक्के म्हणजेच जवळपास ३४० दलघमी पाणी उपलब्ध झाले आहे. पण त्याच वेळी बीड जिल्ह्यातील मोठा प्रकल्प असलेल्या माजलगाव प्रकल्पात ० टक्के जलसाठा आहे. 

परभणी जिल्ह्यातील ढालेगाव बंधारा, येलदरी, मुद्गल, मुळी, डिग्रस हे तर हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर प्रकल्पही कोरडाठाकच आहे. नांदेडच्या विष्णूपुरी बंधारा आजही मृतसाठ्यातच आहे. जिल्ह्यातील अंत्येश्वर, अप्पर मानार प्रकल्प हे ही कोरडेच आहेत. नांदेड जिल्ह्यात असलेल्या दोन मोठ्या प्रकल्पापैकी लोअर मानार प्रकल्पात १५ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. आमदुरा बंधाऱ्यात १२ दलघमी तर बळेगाव बंधाऱ्यात ६ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. तेलंगणाच्या सिमेवरील बहुचर्चेतील बाभळी बंधाराही कोरडाच आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या बंधाऱ्याचे संपूर्ण दरवाजे उघडे ठेवण्यात आले आहेत.पाण्याची परिस्थिती लक्षात घेता नांदेड जिल्हा प्रशासनाने पर्यायी उपाययोजनांना सुरुवात केली       आहे.त्याचवेळी परभणी जिल्हाधिकारी शिव शंकर यांनी सांगितले, आतापर्यंत जिल्ह्यात ३० टक्के पाऊस झाला. या पावसाने भूजल पातळी वाढण्यास मदत झाली आहे. पावसाचे दोन महिने उलटले असले तरी अद्याप दोन महिने शिल्लक आहे. या दोन महिन्यात पावसाची अपेक्षा आहे. त्याचवेळी जायकवाडी धरण भरत असल्याने परभणी जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी मार्गी लागला असल्याचे जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी  स्पष्ट केले. 

निजामसागरात ३ टक्के साठामराठवाड्यातील गोदावरी नदीवर असलेले बंधारे कोरडे असल्याने सीमावर्ती भागात असलेल्या तेलंगणा राज्यात असलेल्या निजामसागर प्रकल्पातही ३.६५ दलघमी जलसाठा उरला आहे.  याच भागातील पोचमपाड प्रकल्पात ८.३२ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे मराठवाड्यातील  प्रकल्पांप्रमाणेच तेलंगणातील प्रकल्पांचेही पाण्याअभावी हाल आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :DamधरणJayakwadi Damजायकवाडी धरणMarathwadaमराठवाडा