शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

राष्ट्रीय आरोग्य समितीचा दौ-यात माहिती देताना अधिका-यांची धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 11:41 IST

समितीने रुग्णालयातील प्रत्येक विभागात जाऊन रुग्णालयाने राबविलेल्या कार्यक्रमांची माहिती घेतली. समितीला माहिती देताना अधिकारी- कर्मचा-यांची चांगलीच धांदल उडाल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देसमितीने जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रत्येक विभागाची केली पाहणी समितीमधील अधिका-याने आम्ही रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात माहिती घेण्यासाठी आलो नाहीत तर पाहणी करण्यासाठी आलो आहोत.

परभणी :  जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय  आरोग्य समिती रविवारी जिल्हा दौ-यावर आली असून, दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास या समितीने जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी केली. या पाहणीत रुग्णालयातील प्रत्येक विभागात जाऊन रुग्णालयाने राबविलेल्या कार्यक्रमांची माहिती घेतली. समितीला माहिती देताना अधिकारी- कर्मचा-यांची चांगलीच धांदल उडाल्याचे दिसून आले.

केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने दरवर्षी राज्यातील दोन जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा आढावा घेतला जातो. यावर्षी ५ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय आरोग्य समिती परभणी जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा आढावा घेत आहे. ही समिती जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालयाची तपासणी करणार आहे. 

रविवारी सकाळी ११.३० वाजता या समितीचे जिल्ह्यात आगमन झाले. दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात ही समिती दाखल झाली. नवीन प्रशासकीय इमारतीत जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कक्षामध्ये या समितीतील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. प्रशासकीय इमारतीतील टेलिमेडिसीन कक्षास समितीने भेट दिली. या कक्षातून रुग्णांसाठी राबविल्या जाणा-या  योजनांची व सुविधांची माहिती घेतली. यावेळी कर्मचा-याकडून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणा-या योजनांचे सादरीकरण करुन घेतले. समितीला माहिती देताना अधिकारी, कर्मचा-यांची चांगलीच धांदल उडत होती. तब्बल अर्धा तास या कक्षात माहिती घेऊन ही समिती रुग्णालयातील पाकगृह विभागाकडे निघाली.

पाकगृहात दिल्या जाणा-या सुविधांची माहिती कर्मचा-यांनी दिली. त्यानंतर स्त्री रुग्णालयात दिल्या जाणा-या सुविधा, स्वच्छता आदी कामांचा समितीने आढावा घेतला. रात्री उशिरापर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रत्येक विभागाची माहिती घेण्यात आली.या समितीत केंद्रीय पातळीवरील दहा व विभागीय पातळीवरील दहा अशा २० अधिका-यांचा समावेश आहे. ही समिती ८ नोव्हेंबरपर्यंत  दौ-यावर असून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा घेणार आहे.

दोन तास बंद दाराआड चर्चापरभणी- राष्ट्रीय आरोग्य समितीच्या सदस्यांनी रविवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील आरोग्य विभागातील अधिका-यांसमवेत दोन तास बंद दाराआड चर्चा केली. परभणी जिल्ह्यातील आरोग्य विभागातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी केंद्रस्तरीय राष्ट्रीय आरोग्य समिती रविवारी परभणीत दाखल झाली आहे. या समितीमध्ये केंद्रस्तरावरील १० सदस्यांचा समावेश आहे. डॉ.एस.ए. अग्रवाल हे समिती प्रमुख असून डॉ.ज्योती, डॉ.पद्मावती, डॉ.सुशांत अग्रवाल, डॉ.अपर्णा कुल्लू, डॉ. प्रशांत कुमार, डॉ.निताशा कौर, विवेक सिंघल, सत्यजीत साहू, डॉ.अजय प्रकाश हे सदस्य परभणीत दाखल झाले आहेत.

रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास समितीच्या सदस्यांचे जिल्हाधिकारी कार्यालय आगमन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आरोग्य विभागाच्या अधिकाºयांसमवेत समितीच्या सदस्यांनी चर्चा केली. यावेळी पत्रकार, छायाचित्रकारांनाही बैठकीत प्रवेश नाकारण्यात आला. दोन तास ही बैठक चालली. यात जिल्ह्यातील आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा अशा विविध विषयांवर समितीच्या पदाधिकाºयांनी अधिकाºयांना प्रश्न विचारुन माहिती घेतली. त्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना भेटी देण्याचे नियोजनही करण्यात आले. दुपारी २ वाजेनंतर या सदस्यांनी भोजन घेऊन दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयाच्या पाहणीला प्रारंभ केला. या बैठकीस जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, मनपा आयुक्त राहुल रेखावार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.जावेद अथर यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

समितीच्या दौ-यामुळे रुग्णालय झाले चकाचककेंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य समिती जिल्हा दौ-यावर येणार असल्याचा कार्यक्रम रुग्णालय प्रशासनाला आला होता. या दौ-याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन १५ दिवसांपासून तयारीला लागले होते. रुग्णालयाची पाहणी करताना समितीने नाराजी व्यक्त करु नये, यासाठी रुग्णालय परिसरात स्वच्छता, रंगरंगोटी, योजनांच्या माहिती संदर्भातील पोस्टर्स ठिकठिकाणी लावले होते.

तसेच रुग्णालयातील दस्ताऐवज अद्ययावत करुन ठेवले होते. रुग्णालयातील प्रत्येक वार्ड स्वच्छ केला होता. त्यामुळे रविवारी प्रथमच रुग्णालय चकाचक दिसत होते. राष्ट्रीय समितीच्या दौ-यात विचारल्या जाणा-या प्रत्येक योजनेची अद्ययावत माहिती विभागप्रमुखांकडे ठेवण्यात आली होती. त्यामुळे रविवारी रुग्णालय व परिसर समितीसाठी चकाचक करुन ठेवला होता.

आम्ही केवळ पाहणीसाठी आलोतराष्ट्रीय समिती जिल्हा रुग्णालयातील पाकगृहातील माहिती घेत होती. तेव्हा एका पोलीस अधिका-यांने पत्रकारांना माहिती घेण्यासाठी थांबू द्यायचे का? असा प्रश्न राष्ट्रीय समितीतील पथक प्रमुखास केला. तेव्हा या अधिका-याने आम्ही रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात माहिती घेण्यासाठी आलो नाहीत तर पाहणी करण्यासाठी आलो आहोत. त्यामुळे आम्हाला आमचे काम करु द्या, असे उत्तर दिले. त्यावर विरोधात नाही तर रुग्णालयाच्या बाजुने आला आहात का? असा प्रश्न पत्रकारांनी केला. तेव्हा मात्र पथकप्रमुख निरुत्तर झाले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल