शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

विष्णुपुरी धरणात ९१ टक्के जलसाठा, तर येलदरी, सिद्धेश्वर ३१ टक्क्यांवरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 19:59 IST

परभणी, हिंगोलीत दमदार पावसाची गरज

हिंगोली : नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी प्रकल्पात ९१.३५ टक्के पाणीसाठा झाला असला तरी हिंगोली जिल्ह्यातील येलदरी आणि सिद्धेश्वर या प्रकल्पांमध्ये मात्र अवघा ३१ टक्के उपयुक्त पाण्यासाठी झाला आहे. त्यामुळे हिंगोलीसह परभणी जिल्ह्यातही दमदार पावसाची गरज आहे.

आठवडाभरापासून पावसाला प्रारंभ झाला आहे. नांदेड, परभणी, हिंगोली या तीनही जिल्ह्यांमध्ये पाऊस होत असला तरी प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात मात्र पुरेशी वाढ झाली नाही. नांदेड येथील विष्णुपुरी प्रकल्पात ९१.३५ टक्के पाणीसाठा झाला असल्याने ही समाधानाची बाब असली तरी हिंगोली जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात ३१.६८ टक्के आणि सिद्धेश्वर प्रकल्पात ३१.३६ टक्के पाणीसाठा झाला आहे. नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्याची तहान भागवणारा प्रकल्प अशी येलदरी प्रकल्पाची ओळख आहे. या प्रकल्पात उपयुक्त जलसाठा अद्याप समाधानकारक नसल्याने चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे आगामी काळात प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस होण्याची अपेक्षा, अशा दोन्ही जिल्ह्यातील नागरिक बाळगून आहेत.

नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक जलसाठानांदेड पाटबंधारे मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या नांदेड जिल्ह्यामध्ये १०४ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये ५५.४६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात ३१ प्रकल्प असून त्यात ३१.७८ टक्के पाणीसाठा झाला आहे तर परभणी जिल्ह्यामध्ये ७ प्रकल्प असून त्यामध्ये ४७.३८ टक्के पाणीसाठा झाल्याची माहिती या मंडळांनी दिली.

इसापुरमध्ये ४६ टक्के साठायवतमाळ जिल्ह्यातील इसापूर प्रकल्पातील पाण्याचा लाभा नांदेड आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होतो. १२७९ दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या या प्रकल्पामध्ये ४४४.०६ दलघमी पाणीसाठा उपलब्ध झाला असून, त्याची टक्केवारी ४६.०६ टक्के एवढी आहे.

कोणत्या प्रकल्पात किती टक्के साठामानार : ५५विष्णुपुरी : ९१.३५येलदरी : ३१.६८सिद्धेश्वर : ३१.३६इसापूर : ४६.०६

टॅग्स :vishnupuri damविष्णुपुरी धरणNandedनांदेडWaterपाणी