शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अडीचशेच्यावर ग्रामस्थांनी सोडले गाव; रोजगाराअभावी गावात उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 11:59 IST

ग्रामस्थांची कामासाठी भटकंती

ठळक मुद्देखोकलेवाडी येथील स्थितीगावात २०० च्या आसपास कुटुंब संख्या आहे.

- अन्वर लिंबेकर 

खोकलेवाडी (जि. परभणी) : दुष्काळी परिस्थितीचा मोठा फटका खोकलेवाडी या गावाला बसला असून गावात काम मिळत नसल्याने अडीचशेपेक्षा अधिक ग्रामस्थांनी गाव सोडले आहे. साधारणत: १२०० मतदार असलेल्या या गावातील बहुतांश ग्रामस्थ बाहेरगावी कामाच्या शोधार्थ गेल्याने अनेक घरांना कुलूप लागले आहे. सोमवारी ‘लोकमत’ने केलेल्या ‘आॅन दी स्पॉट रिपोर्ट’ मध्ये ही परिस्थिती दिसून आली.

संपूर्ण गंगाखेड तालुकाच दुष्काळाच्या तीव्र झळा सहन करीत आहे. पाणी आणि चारा टंचाई पाठोपाठ मजुरांचे स्थलांतर हा गंभीर प्रश्न तालुक्यात निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गंगाखेड शहरापासून १५ कि.मी.अंतरावर असलेल्या खोकलेवाडी या गावची परिस्थिती जाणून घेण्यासाठी सोमवारी थेट गावात भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली तेव्हा दुष्काळाची दाहकता दिसून आली. साधारणत: २ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात १२०० मतदार आहेत. तर २०० च्या आसपास कुटुंब संख्या आहे. ८०० मजुरांनी रोजगार हमी योजनेकडे नोंदणी केली आहे. सध्या या गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावातील हातपंप आटले असून पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीचे पाणीही तळाला गेले आहे. गावात पिण्यासाठीच पाणी मिळत नसून शेतीचा तर प्रश्नच येत नाही. परिणामी शेतातील कामेही ठप्प आहेत.

गावात आणि परिसरात कामेच नसल्याने सुमारे अडीचशेहून अधिक मजुरांनी गाव सोडले असून त्यांनी पुणे, हैदराबाद, औरंगाबाद, गंगाखेड शहर आदी ठिकाणी स्थलांतर केल्याचे समोर आले. काही मजुरांच्या घराला चक्क कुलूप लागले असून त्यांचे कुटुंबासह स्थलांतर झाल्याचे गावकºयांनी सांगितले. शेती हा मुख्य व्यवसाय असलेल्या या गावात शेतीची कामे शिल्लक नाहीत. काही छोटेमोठे व्यवसाय चालतात. मात्र दुष्काळाने हे व्यवसायही डबघाईला आले आहेत. त्यामुळे रोजची गुजरान करण्यासाठी गाव सोडण्याशिवाय पर्याय नसल्याने या गावातून सर्वाधिक स्थलांतर झाले आहे. स्थलांतर रोखण्यासाठी मात्र ठोस पाऊले उचलली जात नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत.

गावात फक्त वृद्ध, मुलेखोकलेवाडी गावाला सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास भेट दिली त्यावेळेस गावातील तरुण व कर्ते व्यक्ती रोजगाराच्या शोधार्थ इतरत्र गेल्याचे दिसून आले. गावामध्ये महिला, वृद्ध व लहान मुलेच मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले. काही तरुण गंगाखेड येथे दररोज रोजगारासाठी ये-जा करतात. अशातच हातालाही काम नाही. त्यामुळे संपूर्ण गाव ओसाड पडले आहे. तशी प्रतिक्रिया गावातील पद्ममीनबाई व्यंकटी राजपुंगे, गंगाधर बाबुराव धोंडकर, पार्वतीबाई भानूदास सावंत यांनी दिली.

टॅग्स :droughtदुष्काळparabhaniपरभणीWaterपाणी