शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

रस्त्यासाठी गाव विक्रीला; चिखलामुळे बोलीदारही फिरकेनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 06:46 IST

थाळ्या वाजवल्या, अर्धनग्नही झाले; साहेब, अजून काय करायचे?

परभणी : पूर्णा तालुक्यातील माहेर पाटीपासून ते गावापर्यंतचा तीन किमी रस्ता तयार करून देण्यासाठी ग्रामस्थांनी २३ सप्टेंबर रोजी गाव विक्रीला काढले. मात्र, गावात येणाऱ्या रस्त्यावर गुडघाभर चिखल असल्याने इतर गावांतील बोलीदारही गावात आले नाहीत. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी ग्रामस्थांनी रस्त्यावरील चिखलात उभे राहून थाळ्या वाजवल्या, तर मंगळवारी अर्धनग्न होत आंदोलन केले. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे साहेब तुम्हीच सांगा हो, आम्ही अजून काय करायचे, असा सवाल ग्रामस्थ करत आहेत.  

वर्षभरापूर्वी माहेर गावातील रहिवाशांनी रस्त्यासाठी उपोषण केल्यावर जिल्हाधिकारी व जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आश्वासन दिले. त्यानंतर या रस्त्यावर कच्चे खडक टाकण्यात आले. मात्र, रस्त्याची दुरुस्ती झालीच नाही. रस्त्यावर आठ महिने दोन-तीन फूट चिखल राहतो. या चिखलातून ग्रामस्थांना तालुका, जिल्ह्याचे ठिकाण गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. मागील वर्षी शालेय पोषण आहाराचा ट्रक रस्त्याअभावी परत गेल्याने जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या फौजफाट्याने गाव गाठले. विशेष म्हणजे तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना आपल्या गाड्या सोडून पायीच गाव गाठावे लागले होते. 

प्रशासन ढिम्मच  संतप्त ग्रामस्थांनी २५ सप्टेंबरपर्यंत रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर गाव, घर, शेतीवाडीही बोलीद्वारे विक्रीस काढण्याचा निर्णय घेतला. तसे निवेदन २२ सप्टेंबर रोजी तहसीलदार पल्लवी टेमकर यांना दिले. त्यानंतर तरी प्रशासन तातडीने पावले उचलत रस्ता दुरुस्तीबाबत निर्णय घेईल असे वाटत होते. मात्र, तसे काहीही झाले नाही.   

१६ वर्षांपूर्वी रस्त्याचे माती काम माहेर  हे गाव ताडकळस ते पालम राज्य रस्त्यावर पश्चिमेस साडेतीन कि.मी. अंतरावर आहे. मात्र, या गावाला इतर गावाशी, मुख्यालयाशी तालुका व जिल्हा जोडणारा दळणवळणासाठीचा पक्का रस्ता नाही. २००५ मध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने या रस्त्याचे खोदकाम व मातीकाम करण्यात आले होते. त्यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकMaharashtraमहाराष्ट्र