शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Video: थरारक! पाथरीत मध्यरात्री कारने घेतला अचानक पेट, काहीवेळातच झाली भस्मसात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 14:41 IST

पाथरीमध्ये १२ तासांत दोन आगीच्या घटना, एकाचा ऊस तर एकाची कार भस्मसात

- विठ्ठल भिसे पाथरी: पाथरी -  सेलू रस्त्यावर खेडूळा पाटीजवळ उभ्या असणाऱ्या एका कारला आज पहाटे १२. १५ वाजता अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच  पाथरी न.पा च्या अग्निशामक दलाने तत्परता दाखवत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. 

तालुक्यातील खेडुळा पाटी जवळ १० मे रोजी पहाटे १२.१५ च्या सुमारास पाथरी येथील भानुदास दिवाण यांच्या मालकीची कार विटभट्टी जवळ उभी होती. यावेळी या कारने अचानक पेट घेतला. या घटनेची माहिती पाथरी अग्निशमन दलाला देण्यात आली.  तातडीने अग्निशामक बंब घटनास्थळी पोहचेपर्यंत कारच्या इंधन टाकीत स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. सुदैवाने यावेळी कारमध्ये कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही. 

१२ तासांत दोन आगीच्या घटना दरम्यान, याच परिसरात १२ तासांपूर्वी गुरुवार ९ मे रोजी दुपारी १ च्या सुमारास विशाल पामे यांच्या शेतातील खोडवा उसात आग लागली होती. याही ठिकाणी पाथरी न .पा.च्या  अग्निशामक दलाने शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. यावेळी सदरील शेतऱ्याचा ऊस जळून आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, दोन्ही आगीच्या ठिकाणी आग आटोक्यात आणण्यासाठी पाथरी न.पा च्या अग्निशामक दलाच्या शारेफ खान , खुर्रम खान, शेख शेरु , बळीराम गवळे यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :parabhaniपरभणीfireआग