शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Video: परतीच्या पावसाचा पुन्हा तडाखा, आवक वाढल्याने येलदरी धरणाचे १० दरवाजे उघडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 15:13 IST

एकूण २३, ९३० क्युसेक क्षमतेने सध्या येलदरी धरणातून विसर्ग सुरु आहे.

- प्रशांत मुळी

येलदरी ( परभणी) : परतीच्या पावसाने मागील चार दिवसांपासून हाहाकार माजवला आहे. प्रचंड प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. येलदरी धरणाच्या वरच्या भागात असलेल्या खडकपूर्णा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने येलदरी धरणात आवक वाढली आहे. पाऊस आणि वाढती आवक लक्षात घेता प्रशासनाने येलदरी धरणाचे आज सकाळी ६ दरवाजे तर दुपारी सर्वच्या सर्व १० दरवाजे उघडण्यात आले आहेत.

सध्या धरणाच्या सर्व दहा दरवाजातून २२, १२० क्युसेक क्षमतेने विसर्ग होत आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती पूर्णा पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान, पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

असा सुरु आहे विसर्ग अचानक वरच्या धरणातून आवक वाढल्याने आज सकाळी गेट क्रमांक १, ३, ५, ६, ८ आणि १० उघडून विसर्ग सुरु करण्यात आला होता. मात्र आवक आणि पावसाचा अंदाज घेऊन दुपारी २ वाजता पुन्हा धरणाचे गेट क्र. २, ४, ७ आणि दरवाजे उघडण्यात आली. सर्व दहा दरवाजे ०. ५ मीटरने उघडून  सध्या  २२, १२० क्युसेकने विसर्ग सुरु आहे. तर जल विद्युत केंद्रातून १८०० क्युसेक असा एकूण २३, ९३० क्युसेक क्षमतेने सध्या येलदरी धरणातून विसर्ग सुरु आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणRainपाऊस