शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

परभणीत भाजीपाल्याचे दर गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:35 IST

काही दिवसांपूर्वी वधारलेला भाजीपाला, फळे व कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे़ दररोजच्या आहारात असलेल्या मेथी, शेपू, कोथंबीर, टोमॅटो, वांगी या भाज्यांना शहरातील बाजारपेठेत कवडीमोल दर मिळत असल्याचे रविवारी केलेल्या पाहणीतून दिसून आले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : काही दिवसांपूर्वी वधारलेला भाजीपाला, फळे व कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे़ दररोजच्या आहारात असलेल्या मेथी, शेपू, कोथंबीर, टोमॅटो, वांगी या भाज्यांना शहरातील बाजारपेठेत कवडीमोल दर मिळत असल्याचे रविवारी केलेल्या पाहणीतून दिसून आले़मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे़ त्यामुळे खरीप व रबी हंगामात शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणाºया नगदी व पारंपारिक पिकांतून शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागले नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी भाजीपाला व फळपिकांकडे वळताना दिसून येत आहेत़मागील आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांश शेतकºयांचा फळे व भाजीपाला निसर्गाने मातीस मिळविला़ त्यामुळे परभणी शहरातील क्रांती चौक, शनिवार बाजार, गांधी पार्क, वसमत रस्त्यावरील काळी कमान, जिंतूर रस्त्यावरील महाराणा प्रताप चौकासह इतर ठिकाणच्या बाजारपेठेत भाजीपाल्यांचे भाव चांगलेच वधारले होते़ त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकºयांमध्ये भाजीपाल्यांतून मिळालेल्या उत्पादनाबद्दल समाधान होते; परंतु, डिसेंबर महिन्याच्या १५ तारखेपासून शहरातील बाजारपेठेत भाजीपाल्याची मोठी आवक होताना पहावयास मिळत आहे़ याचा थेट परिणाम भाजीपाला व फळांच्या दरांवर झाल्याचे दिसून आले़रविवारी केलेल्या पाहणीमध्ये २०० रुपये किलो असणारी कोथंबीर १० रुपयांना दोन जुड्या विक्री होताना दिसून आली. त्याचबरोबर २० रुपये दराने एक जुडी मिळणारी मेथी शनिवारी केलेल्या पाहणीत १० रुपयांच्या चार जुड्या विक्री होताना दिसून आल्या़गेल्या काही दिवसांत भाजीपाल्यांचे गगनाला भिडलेले दर अचानक घसरले़ त्यामुळे बाजारातील ओट्यांवर भाज्यांचे ढिग दिसून येत आहेत़घसरलेल्या दरामुळे भाजीपाला विक्रीसाठी आणावयाचा खर्च देखील वसूल होत नसल्याने अनेक शेतकºयांच्या शेतात भाज्या पडून आहेत़ त्यामुळे शेतकºयांनी भाजीपाल्यांवर केलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे़ त्यामुळे भाजीपाला उत्पादक आर्थिक कोंडीत सापडले आहेत़कांद्याचे भाव वधारले४जिल्ह्यात भाजीपाल्याचे भाव गडगडले असले तरी कांद्याचे भाव अद्याप कमी झाले नाहीत़४कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली असून, बाजारपेठेत सद्यस्थितीला १०० रुपये किलो प्रमाणे कांद्याची विक्री होत आहे़४त्यामुळे इतर भाजीपाल्यांच्या तुलनेत कांद्याचे भाव वधारलेले आहेत़आवक वाढल्याने घसरले भाव४मागील महिनाभरात भाज्यांचे भाव चांगलेच वधारले होते़ त्यातून शेतकºयांना चांगला पैसाही मिळाला़ त्यामुळे शेतकºयांनी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जलस्त्रोतातील पाण्याचा उपयोग घेवून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड केली आहे़ सध्या १५ डिसेंबरपासून बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मेथी, भेंडी, गवार, टोमॅटो, शेपू आदी भाज्यांची आवक होत आहे़ त्यामुळे आवक वाढल्याने बाजारपेठेतील भाज्यांचे भाव मात्र गडगडल्याचे दिसून येत आहेत़ एकीकडे नैसर्गिक संकटांचा सामना करणाºया शेतकºयांना उत्पादन झाले तर बाजारपेठेतील गडगडत्या भावाचा सामना करावा लागत असल्याचे पाहणीतून दिसून आले़असे होते दरमेथी- १० रुपये (४ जुड्या)पालक- १० रुपये (२ जुड्या)कोथंबीर- १० रुपये (२ जुड्या)शेपू- १० रुपये (३ जुड्या)टोमॅटो १० रुपये (१ किलो)वांगी- ३० रुपये (१ किलो)मिरची- ५० रुपये (१ किलो)दोडका- ३० रुपये (१ किलो)भेंडी- ३० रुपये (१ किलो)

टॅग्स :parabhaniपरभणीvegetableभाज्या