शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Valentine Day : सामाजिक ध्येयातून जुळली मने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 13:44 IST

कॉ़ राजन आणि अ‍ॅड़ माधुरी क्षीरसागर दाम्पत्याने खऱ्या अर्थाने पीडितांच्या प्रश्नांमध्ये जिव्हाळा शोधला आहे.

- प्रसाद आर्वीकर

परभणी : प्रेमाच्या आणा-भाका घेऊन सुखी संसाराचे इमले रचण्याच्या प्रेमकहाण्या नव्या नाहीत; परंतु, या प्रेमापलीकडे जाऊन समाजातील दीन-दलित, पीडितांच्या प्रश्नांवर काम करीत सामाजिक ध्येयातून एकत्र येत येथील कॉ़ राजन आणि अ‍ॅड़ माधुरी क्षीरसागर दाम्पत्याने खऱ्या अर्थाने पीडितांच्या प्रश्नांमध्ये जिव्हाळा शोधलाआहे.

माधुरी बापूराव कुलकर्णी या मूळच्या पुणे येथील तर राजन रामचंद्र क्षीरसागर हे सोलापूर जिल्ह्यातील. पुणे येथे सर परशुरामभाऊ महाविद्यालयात १९८६ मध्ये बी.एस्सी.चे शिक्षण घेताना दोघेही वर्गमित्र होते. शिक्षण सुरू असताना राजन क्षीरसागर हे लोकविज्ञान संघटनेत काम करीत होते. वैज्ञानिक प्रचार, प्रसार करणे, तंत्रज्ञानाचा वापर जनतेसाठी व्हावा, विघातक कामासाठी होऊ नये, हा मूळ उद्देश समोर ठेवून ही संघटना काम करीत होती. माधुरी या स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडियामध्ये (एसएफआय) काम करायच्या. दोघांवरही डाव्या विचारांचा पगडा असल्याने सोबत काम करण्यास सुरुवात केली आणि यातूनच लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि १३ मार्च १९९० रोजी विवाहबद्ध झाले.

पुढे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काम करीत असताना राजन यांच्यावर परभणी जिल्ह्याची जबाबदारी आली आणि त्यांच्यासोबत काम करण्यासाठी याच जिल्ह्यात भारत ज्ञानविज्ञान समितीच्या माध्यमातून माधुरी क्षीरसागर यांनी कामाला सुरुवात केली़ स्त्री शिक्षण, संपूर्ण साक्षरता अभियान, महिलांचे प्रश्न घेऊन माधुरी यांनी तर राजन क्षीरसागर यांनी शेतकरी, शेतमजूर, हमाल, मापाड्यांच्या प्रश्नांवर कामाला सुरुवात केली़ १५ वर्षांपासून हे दाम्पत्य समाजातील पीडित आणि शोषितांसाठी एकत्र येऊन काम करीत आहे़मार्ग वेगळे; ध्येय मात्र एक‘आमच्या दोघांचाही वैचारिक पगडा वेगळा आहे. राजन यांचे विचार राजकीय, तंत्रस्नेही आणि माझे विचार सामाजिक अधिष्ठान असलेले. दोघांचीही काम करण्याची पद्धत वेगळी असली तरी समाजातील पीडितांना न्याय देणे या ध्येयातूनच आम्ही काम करतो. त्यामुळे काम करण्याच्या पद्धती वेगळ्या असल्या तरी ध्येय मात्र एक आहे’, माधुरी क्षीरसागर सांगत होत्या.

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेSocialसामाजिकsocial workerसमाजसेवक