परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत प्राथमिक कृषी पतपुरवठा, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या मानवत गटातून बँकेचे विद्यमान अध्यक्ष पंडितराव चोखट, मानवत बाजार समितीचे माजी सभापती गंगाधर कदम आणि आकाश पंडितराव चोखट असे ३ अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी गंगाधर कदम यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज परत घेतला होता. त्यामुळे पंडितराव चोखट यांची बिनविरोध निवड होणार हे निश्चित झाले होते. बुधवारी आकाश चोखट यांनीही त्यांचा अर्ज मागे घेतला असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली. त्यामुळे पंडितराव चोखट यांची बिनविरोध निवड झाली आहे. यापूर्वी आ. बाबाजानी दुर्राणी व माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. आता १९ जागांसाठी ८३ उमेदवारांचे अर्ज आहेत. १० मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज परत घेता येणार असल्याने येत्या ५ दिवसांत राजकीय घडामोडी वाढणार आहेत.
पंडितराव चोखट यांची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:31 IST