शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
3
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
4
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
5
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
6
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
7
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
8
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
9
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
10
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
11
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
12
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
13
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
14
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
15
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
16
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
17
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
18
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
19
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
20
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना खासदार बंडू जाधव यांच्यावर अदखलपात्र गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 19:30 IST

शिवसेनेचे ताडकळस येथील शहरप्रमुख बालाजी रुद्रवार यांच्या तक्रारीवरुन शिवसेनेचेच खा. बंडू जाधव यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणी : माझ्या विरोधात तू बोलत आहेस, असे म्हणून दमदाटी करीत मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे ताडकळस येथील शहरप्रमुख बालाजी रुद्रवार यांच्या तक्रारीवरुन शिवसेनेचेच खा. बंडू जाधव यांच्याविरुद्ध परभणीतील नानलपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी- पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील शिवसेनेचे शहरप्रमुख बालाजी चंद्रकांत रुद्रवार यांनी रविवार दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास  पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची भेट घेऊन  खा.बंडू जाधव यांच्याविषयी तक्रार दिली.  त्यामध्ये  खा. जाधव यांनी २३ सप्टेंबर रोजी मला घरी बोलावून घेतले. घरी आल्यानंतर तू माझ्या विरोधात का बोलतोस, असे म्हणून खा. जाधव व रामप्रसाद रणेर यांनी मला थापड-बुक्क्यांनी मारहाण केली, असे म्हटले आहे. या तक्रारीवरुन सोमवारी कलम ३२३, ५०६ भा.दं.वि.नुसार नानलपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार पिंपळे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

या प्रकरणी प्रतिक्रियेसाठी खा.जाधव यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता, ते म्हणाले की, गेल्या चार-पाच महिन्यांपासून रुद्रवार हे माझ्या विरोधात चुकीचे वक्तव्य करीत आहेत़ याबाबत त्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी त्यांना बोलावून घेतले होते़ यावेळी त्यांना त्यांचेच मोबाईलवरील रेकॉर्डिंग ऐकावित असताना ते आपल्याविषयी एकेरी भाषेचा वापर करीत होते़ यावेळी सोबतच्या कार्यकर्त्याचा राग अनावर झाल्याने ते त्यांच्या अंगावर धावून गेले़ मी जबाबदार लोकप्रतिनिधी आहे़ त्यामुळे रुद्रवार यांना कोणीही मारहाण केलेली नाही़ त्यांचा आरोप चुकीचा आहे, असे ते म्हणाले़ 

दरम्यान, रुद्रवार हे ताडकळसचे माजी सरपंच आहेत. त्यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ सोमवारी ताडकळस येथील काही दुकाने दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी गावात चोख बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Jadhavसंजय जाधवPoliticsराजकारणPoliceपोलिसparabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी