शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे फाटकावर उभ्या दुचाकींना टेंपोची धडक; १ ठार तर तीन गंभीर जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 19:25 IST

मानवतरोड येथील रेल्वे फाटकावर उभ्या असलेल्या दोन दुचाकींना पाठीमागुन आलेल्या आयशर टेंपोने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील एक १२ वर्षीय मुलगा जागीच ठार झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले.

मानवत (परभणी ): मानवतरोड येथील रेल्वे फाटकावर उभ्या असलेल्या दोन दुचाकींना पाठीमागुन आलेल्या आयशर टेंपोने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील एक १२ वर्षीय मुलगा जागीच ठार झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. 

राष्ट्रीय महामार्गावर मानवतरोड रेल्वेस्थानका लगतच रेल्वेचे  फाटक आहे. सायंकाळी येथे तपोवन एक्सप्रेस येत असल्याने रेल्वे फाटक लावण्यात आले होते. यावेळी मानवत रोड येथील साईनाथ पवार आणि त्यांचा १२ वर्षीय मुलगा विशाल हे आपल्या दुचाकीवर फाटका जवळ थांबले होते. याच दरम्यान परभणी कडुन पाथरीकडे एक आयशर टेंपो भरधाव वेगाने जात होता. फाटकाजवळ चालकाचा टेंपोवरील ताबा सुटल्याने टेंपोने पवार यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात विशाल जागीच ठार झाला तर साईनाथ हे गंभीर जखमी झाले. यासोबतच टेंपो ने आणखी एका दुचाकीला जोराची धडक दिली. यात माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील हनुमंत मुळे आणि मिरा मुळे हे पती - पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी पैकी साईनाथ पवार यांना परभणीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पवार यांनी घटनास्थळी धाव घेत टेंपो चालकाला ताब्यात घेतले.

टॅग्स :Accidentअपघातtwo wheelerटू व्हीलरDeathमृत्यूparabhaniपरभणी