शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जिंतूरच्या दुकानातील चोरी प्रकरणात दोघे ताब्यात

By राजन मगरुळकर | Updated: August 12, 2023 18:10 IST

चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

परभणी : जिंतूर शहरातील बसस्थानक परिसरात एका दुकानामध्ये झालेल्या चोरीच्या घटनेतील दोन आरोपींना परभणीपोलिसांच्या पथकाने जिंतूर येथून नुकतेच ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

जिंतूर शहरातील बसस्थानक समोरील संस्कृती झेरॉक्स सेंटर येथून एक इन्व्हर्टर, दोन बॅटरी, लॅमिनेशन मशीन असा मुद्देमाल चोरीस गेला होता. या प्रकरणी जिंतूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याच्या तपासात आरोपीचा शोध घेतला असता गोपनीय माहिती मिळाली. ज्यात हा गुन्हा तीन आरोपींनी मिळून केल्याचे समजले. त्यापैकी दोन आरोपी शेख सोहेल शेख रसूल (रा. चपराशी कॉलनी, जिंतूर), शिवाजी शामराव सोळंके (रा. बंजारा कॉलनी) यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली. तिसरा आरोपी सय्यद माबूद सय्यद मन्सूर (रा. गुलशन कॉलनी, जिंतूर) यास मंगळवारी अटक करण्यात आली. या आरोपीस दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आरोपी शेख सोहेल याच्याकडून १९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला तर एकूण ३० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक रागसुधा आर., पोलिस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी पांडुरंग गोफणे, पोलिस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मुख्तार सय्यद, खोले, पोलिस कर्मचारी दीपक वाटोडे, संदीप पांचाळ यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसparabhaniपरभणी