टोकन पद्धतीमुळे लसीकरण केंद्रावरील गर्दी ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:16 AM2021-05-10T04:16:45+5:302021-05-10T04:16:45+5:30

कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयाबरोबर तालुक्यातील धारासुर, महातपुरी, राणीसावरगाव, पिंपळदरी, कोद्री, आदी गावांतील प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या ...

The token system reduced the crowd at the vaccination center | टोकन पद्धतीमुळे लसीकरण केंद्रावरील गर्दी ओसरली

टोकन पद्धतीमुळे लसीकरण केंद्रावरील गर्दी ओसरली

Next

कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयाबरोबर तालुक्यातील धारासुर, महातपुरी, राणीसावरगाव, पिंपळदरी, कोद्री, आदी गावांतील प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दिवसभरात केवळ दोनशे लस दिल्या जात असल्याने तासनतास रांगेत उभे राहून शेवटी आल्या हाताने परत जाणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. लसीकरण केंद्रावर होत असलेल्या गर्दीबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच लसीकरण केंद्राबाहेर होत असलेली गर्दी टाळण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने नवीन योजना आखत टोकन पद्धतीचा अवलंब केला आहे. लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना ७ मे रोजी पासून टोकन देणे सुरू केल्याने लसीकरण केंद्राबाहेरील मोठमोठ्या रांगा कमी होऊन गर्दी ओसरल्याचे पाहावयास मिळत आहे. टोकन पद्धतीमुळे नागरिकांचा वेळ आणि होत असलेला त्रास कमी झाल्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने सुरू केलेल्या नव्या पॅटर्नचे नागरिकांतून कौतुक केले जात आहे.

Web Title: The token system reduced the crowd at the vaccination center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.