'काळ आला होता पण...!' भरधाव हायवाची सात वाहनांना धडक; जेवायला गेलेले वाहनचालक थोडक्यात बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 03:04 PM2021-01-07T15:04:03+5:302021-01-07T15:04:39+5:30

Accident in Parabhani गंगाखेड शहरातील परळी रस्त्यावर असलेल्या जिनिंगवर कापूस विक्रीसाठी आलेली कापसाची वाहने जिनिंगबाहेर रांगेत उभी होती.

'The time had come but ...!' Hayva truck hits seven vehicles; The driver who went to eat survived briefly | 'काळ आला होता पण...!' भरधाव हायवाची सात वाहनांना धडक; जेवायला गेलेले वाहनचालक थोडक्यात बचावले

'काळ आला होता पण...!' भरधाव हायवाची सात वाहनांना धडक; जेवायला गेलेले वाहनचालक थोडक्यात बचावले

Next
ठळक मुद्देअपघातात हायवा चालक मात्र स्वतःच जखमी झाला

गंगाखेड (जि. परभणी) : परळीकडे भरधाव जाणाऱ्या हायवा चालकाने कापूस विक्रीसाठी जिनिंगबाहेर थांबलेल्या कापसाच्या ७ वाहनांना दिलेल्या धडकेत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जेवणासाठी गेलेले वाहनचालक मात्र बालंबाल बचावले असून, हायवा चालक स्वतः जखमी झाला आहे.

गंगाखेड शहरातील परळी रस्त्यावर असलेल्या जिनिंगवर कापूस विक्रीसाठी आलेली कापसाची वाहने जिनिंगबाहेर रांगेत उभी होती. ५ जानेवारी रोजी रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास गंगाखेड येथून परळीकडे जाणाऱ्या भरधाव हायवा टिप्पर (क्र.एमएच ४६ बीबी ७६५४) च्या चालकाने हयगय व निष्काळजीपणे चालवून सात वाहनांना धडक दिली. यामध्ये तुकाराम संतराम बाजगीर, रा. लेंडेगाव (मोझमाबाद), ता. पालम यांच्या उभ्या कापसाच्या आयशर टेम्पो (क्र. एमएच १४ एझेड २१८५) ला जोराची धडक दिल्याने हा टेम्पो रस्त्याखाली जाऊन पलटी झाला, तसेच नारायण विठ्ठलराव सूर्यवंशी यांच्या टेम्पोसह (क्र. एमएच ०४ बीयू २४०५), (क्र. एमएच २२ एए ३७१६), (क्र. एमएच २१ - ८६२६), (क्र. एमएच १४ एएफ ७२१३), (क्र. एमएच १२ एए ३७३६), (क्र. एमएच २३ - २४४९) सहा वाहनांना धडक देऊन या वाहनांचे मोठे नुकसान केले. 

अपघाताची घटना घडली तेव्हा कापूस विक्रीसाठी आलेले वाहनचालक जिनिंगबाहेर कापसाच्या वाहनांची रांग लावून जेवायला गेल्याने जीवितहानी टळली. हायवा चालक मात्र स्वतःच जखमी झाल्याची फिर्याद तुकाराम संतराम बाजगीर, रा. लेंडेगाव (मोझमाबाद), ता. पालम यांनी दिल्यावरून हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास जमादार रतन सावंत, पो. ना. दत्तराव पडोळे, सुनील लोखंडे, विष्णू वाघ करीत आहेत.
 

Web Title: 'The time had come but ...!' Hayva truck hits seven vehicles; The driver who went to eat survived briefly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.