शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
3
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
4
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
5
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
8
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
9
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
10
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
11
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
12
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
13
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
14
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
17
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
18
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
19
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
20
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

flood : थरारक ! पुरात वाहून जाणाऱ्या पाच जणांचे गावकऱ्यांनी वाचविले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 12:22 IST

flood : फाल्गुना नदीच्या मधोमध प्रवाहमध्ये ट्रॅक्टर आले असता पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे नदीमध्ये हे पाच जण वाहत जात होते.

शेळगाव ( परभणी ) : सोनपेठ तालुक्यातील शेळगाव ते उक्कडगाव रस्त्यावर फाल्गुनी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून जात असलेल्या पाच जणांना वाचविण्यात गावकऱ्यांना ( Villagers rescue five flood victims) यश आले आहे. रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

सोनपेठ तालुक्यात रविवारी रात्री सोनपेठ तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेळगाव ते उक्कडगाव रस्त्यावरील फाल्गुनी नदीलापूर आला होता. १८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास शिवाजी सर्जेराव अडागळे (रा.भोगलवाडी ता.धारुर) हे साखर कारखान्यावर काम करण्यासाठी मजूर आणण्यासाठी जात होते. एम.एच.२२/एच.पी. ७८२४ या क्रमांकाचे ट्रॅक्टर घेऊन ते तालुक्यातील गंगापिंपरी येथे पोहोचले. यावेळी फाल्गुनी नदीला पूर आला होता. नदी पार करुन पैल तिरावर जाण्यासाठी त्यांनी ट्रॅक्टर नदीपात्रातून पुढे नेण्यास सुरुवात केली. यावेळी ट्रॅक्टरमध्ये गणेश राजेभाऊ कांबळे (२४, रा.शेळगाव), विकास शिवाजी उफाडे (२४, रा. गंगापिंपरी), दीपक गुलाब कदम व बाबासाहेब मदनराल कदम (रा.थडी पिंपळगाव) हे सर्व जण त्यांची दुचाकी ट्रॅक्टरमध्ये टाकून गावाकडे जाण्यासाठी ट्रॅक्टरमध्ये बसले होते. फाल्गुना नदीच्या मधोमध प्रवाहमध्ये हे ट्रॅक्टर आले असता पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे नदीमध्ये हे पाच जण वाहत जात होते. वाहून जाणाऱ्या पाच जणांनी आरडा-ओरड केला.

यावेळी या ठिकाणी उपस्थित असलेले बाबा गायकवाड यांनी हा प्रसंग पाहिला. त्यांनी बचावकार्यासाठी गावातील काही ग्रामस्थांना बोलावून घेतले. बाबा गायकवाड, कचरुबा कांबळे, बळीराम कांबळे, विष्णू गायकवाड, अभयराव देशमुख, पोलीस पाटील सुनील गोेरे, भगवान गोरे, अण्णासाहेब बागवाले, भानुदास तळेकर, सोहेल शेख, समीर शेख, अशफाक पठाण, इरफान पठाण, प्रकाश गायाकवाड आदींनी घटनास्थळी जाऊन स्वत:च्या जिवाची पर्वा न करता पाच जणांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर अजितराव देशमुख व पोलीस पाटील सुनील गोरे यांनी ही माहिती पोलीस ठाण्याला दिली. पोलीस निरीक्षक काकडे, बिट जमादार आडे यांनी  घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पुराच्या पाण्यातून वाचविलेल्या पाचही जण सुखरुप आहेत.

टॅग्स :riverनदीfloodपूरparabhaniपरभणी