शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

थरारक! सिग्नलचे वायर तोडली, रेल्वे थांबताच चोरट्यांनी महिला प्रवाशांना लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 12:24 IST

गंगाखेड-वडगाव स्टेशन दरम्यान नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसमधील प्रकार

- अनिल शेटेगंगाखेड (जि.परभणी) : गंगाखेड ते वडगाव स्टेशन दरम्यान वडगाव स्टेशनजवळ रेल्वे सिग्नलचे वायर चोरट्यांनी तोडल्याने नागपूर-कोल्हापूर रेल्वे सिग्नलजवळ थांबली. यावेळी चोरट्यांनी रेल्वेतील चार महिला प्रवाशांची एकूण २३ ग्रॅम सोन्याचे दागिने लुटल्याची घटना २ ऑक्टोबरला पहाटे २ वाजता घडली. याप्रकरणी परळी रेल्वे पोलिस ठाण्यात प्रवाशांनी तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

रेल्वे क्रं (११४०३) नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेस गंगाखेड रेल्वेस्थानक ते वडगाव स्टेशन दरम्यान वडगाव स्थानकाजवळील रेल्वे सिग्नल मिळाले नसल्याने सिग्नल जवळ थांबली. हा प्रकार मंगळवारी मध्यरात्री २ च्या सुमारास घडला. चोरट्यांनी सिग्नलचे तार तोडले होते, तसेच कॉलिंगचे वायर तोडले होते. यामुळे रेल्वे सिग्नलजवळ थांबताच चोरट्याने काही रेल्वे डब्यात प्रवेश केला. दरम्यान, रेल्वे सिग्नलजवळ का थांबली म्हणून वडगाव स्टेशनचे कर्मचारी सिग्नलकडे निघाले होते. याच वेळी चोरट्यांनी प्रवासी डब्यातील चार महिलांचे सोन्याचे दागिने लांबविले. यात तीन महिला प्रवाशांच्या गळ्यातील पाच-पाच ग्रॅमचे असे मिळून १५ ग्रॅम सोन्याचे दागिने पळवले तर एका महिला प्रवाशाचे ८ ग्रॅम सोन्याचे दागिने पळवले. एकूण चार महिला प्रवाशांचे मिळून २३ ग्रॅम सोन्याचे दागिने पळवले.

याप्रकरणी परळी रेल्वे ठाण्यात महिला प्रवाशांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. वडगाव स्टेशन रेल्वेस्थानक कर्मचाऱ्यांनी चोरट्याने सिग्नलचे तार तोडलेल्या ठिकाणी तात्पुरती दुरुस्ती करून सिग्नल सुरू केले. त्यानंतर नागपुर-कोल्हापूर रेल्वे परळीकडे निघाली. घडलेली घटना परळी रेल्वे पोलिस ठाण्यात समजताच चोरट्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक तैनात केले आहे. सिग्नल दुरुस्ती व पाहणीसाठी नांदेड येथून वडगाव स्टेशनला बुधवारी पथक आले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRailway Passengerरेल्वे प्रवासीparabhaniपरभणी