शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
3
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
4
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
5
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
6
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
7
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
8
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
9
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
10
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
11
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
12
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
13
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
14
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
16
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?
17
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
18
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
19
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
20
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश

हाताला काम नसल्याने जिंतूर तालुक्यातून हजारो मजुरांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 20:30 IST

मनरेगांतर्गत तालुक्यात एकही काम सुरू झाले नसल्याने हजारो मजुरांना कामासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासन मात्र काम सुरू करण्याच्या मन:स्थितीत नाही.

जिंतूर ( परभणी ) : मनरेगांतर्गत तालुक्यात एकही काम सुरू झाले नसल्याने हजारो मजुरांना कामासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासन मात्र काम सुरू करण्याच्या मन:स्थितीत नाही. २०१६-१७ मधील ५ कोटींची कामे अजूनही सुरू झालेली नाहीत.

जिंतूर तालुका हा डोंगराळ भाग म्हणून ओळखला जातो. तालुक्यात शेतीशिवाय दुसरे कोणतेच उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध नाही. परिणामी जानेवारी ते जून या सहा महिन्यांत कामासाठी मजुरांना वन वन भटकंती करावी लागते. मागील पाच वर्षापासून तालुक्यात मोठ्या प्रमाणात मनरेगांतर्गत कामे होत असल्याने मजुरांच्या हाताला काम मिळत होते; परंतु, मागील दोन वर्षात प्रशासकीय व राजकीय पातळीवर गोंधळ उडाला आहे. विशेष करून सिंचन विहीर व रस्त्याच्या कामात मोठे गैरप्रकार झाले. अनेक अधिकार्‍यांवर कार्यवाही झाली. त्यामुळे मनरेगाची कामे ठप्प झाली आहेत. 

तालुक्यात ६२५ सिंचन विहिरी दोन वर्षापूर्वी बोगस असल्याचे समोर आले. विधीमंडळात हे प्रकरण चांगलेच गाजले. तब्बल ६ कोटी रुपयांचा हा गैरप्रकार उजेडात आला. परिणामी अनेक अधिकार्‍यांना चौकशीला सामोरे जावे लागले. त्यामुळे मागील दोन वर्षापासून मनरेगााची कामे बंद झाली आहेत. यावर्षी अत्यंत बिकट परिस्थिती जिंतूर तालुक्यात निर्माण झाली आहे. तालुक्यातील मजुरांच्या हाताला कामे नाहीत. गावात पाणीटंचाईच्या तीव्र झळा ग्रामस्थांना सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे मजुरी करणार्‍या मजुरांना हालाकीचे जीवन जगावे लागत आहे. आजघडीला मनरेगांतर्गत एकही काम नाही. मात्र स्वच्छ भारत अभियानांतर्गत शोष खड्डे, रोपवाटिका या  कामांना मंजुरी आहे; परंतु, प्रत्यक्षात कामच सुरू नाही. शिवाय शोष खड्डे जेसीबी मशिनने खोदले जात आहेत. त्यामुळे मजुरांना तालुक्यात काम उपलब्ध नसल्याने मजूृर वर्ग हतबल झाला आहे. कामाच्या शोधासाठी ते मुंबई, पुणे, नाशिककडे स्थलांतरित होत आहेत.  याचे लोकप्रतिनिधी व प्रशासनाला कोणतेही सोयरसुतक नाही.

५ कोटींची कामे सुरू होण्याच्या प्रतीक्षेततालुक्यात दोन वर्षापासून मनरेगाची कामे बंद आहेत. परंतु, २०१६-१७ या वर्षात तांत्रिक मंजुरी मिळालेल्या कामात कृषी विभागाच्या ५३ लाखांचे ५१ नाडेपचे अर्ज प्रलंबित आहे. व्हर्मी कंपोस्टिंगचे १४ लाख ११ हजारांचे २१८ प्रस्ताव पं.स. अंतर्गत येणारे २ लाख १० हजारांचे ८० शोष खड्डे, सामाजिक वनीकरण विभागाच्या १ कोटी १ लाख ८४ हजार रुपयांच्या रोपवाटिका, वनपरीक्षेत्र विभाागाच्या ३ कोटी १८ लाख ३९ हजारांच्या रोपवाटिका, सलग समपातळी चरचे ४७ लाख ५५ हजारांची कामे, अनघड दगडी बांधचे १६ लाख ९८ हजार अशा एकूण ५ कोटी १ लाख ३७ हजार ३७२ रुपयांच्या कामांना २०१६-१७ मध्ये तांत्रिक मंजुुरी मिळवूनही ही कामे सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. 

अधिकारी नाचवित आहेत कागदी घोडेजिंतूर तालुक्यात कामे सुरू करण्याची अधिकार्‍यांची मानसिकता नाही. त्यामुळे कागदोपत्री कामे मंजूर असल्याचे सांगत वेळ निभावून नेण्याचे धोरण अधिकारी वर्गाचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे मजुरांना काम मिळेल, असे एकही काम सुरू नाही. 

कामांना अद्याप सुरूवात नाहीपंचायत समितीमार्फत केवळ शोष खड्डे व विहीर पूनर्भरणाची कामे सुरू आहेत. परंतु, सिंचन विहिरींना अद्याप मंजुरी नाही. त्यामुळे रस्ते व इतर कामांना अद्याप तालुक्यात सुरूवात नाही. -अंकुश चव्हाण, गटविकास अधिकारी

आंदोलन करावे लागेल.तालुक्यात मनरेगांतर्गत कामे सुरू करण्याची प्रशासनाची मानसिकता नाही. जिल्हाधिकारी, आयुक्त शिवाय विधिमंडळामध्ये आवाज उठवूनही प्रशासन जागे होत नाही. त्यामुळे आता रस्त्यावर उतरून प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करावे लागेल.-विजय भांबळे, आमदार जिंतूर

टॅग्स :parabhaniपरभणीpanchayat samitiपंचायत समितीAgriculture Sectorशेती क्षेत्रWaterपाणी