शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात चोरट्यांचा सर्वत्र धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:41 IST

जिल्ह्यात चोरटे सक्रिय झाले असून, सोमवारी रात्री परभणीसह पाथरी आणि मानवत येथे धुमाकूळ घालत १३ दुकाने फोडली. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान एकाच रात्री घडलेल्या या घटनांमुळे पोलिसांसमोर नवे आव्हान उभे टाकले आहे. चोरट्यांनी व्यापाºयांनाच लक्ष्य केल्याचे या घटनांवरुन दिसत असून, पोलिस यंत्रणा कशा पद्धतीने या घटनांचा तपास लावते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात चोरटे सक्रिय झाले असून, सोमवारी रात्री परभणीसह पाथरी आणि मानवत येथे धुमाकूळ घालत १३ दुकाने फोडली. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान एकाच रात्री घडलेल्या या घटनांमुळे पोलिसांसमोर नवे आव्हान उभे टाकले आहे. चोरट्यांनी व्यापाºयांनाच लक्ष्य केल्याचे या घटनांवरुन दिसत असून, पोलिस यंत्रणा कशा पद्धतीने या घटनांचा तपास लावते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.शहरातील खानापूर फाटा परिसरात मंगळवारी पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, सहा दुकाने फोडून नगदी रक्कम व साहित्य असा ६० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.खानापूर फाटा परिसरातील यशवंतनगरात १६ जुलै रोजी पहाटे साधारणत: अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. दीपक कुचे यांच्या मालकीचे तुळजाभवानी मेडिकल या दुकानाचे शटर वाकवून नगदी ३० हजार रुपये चोरट्यांनी पळविले. त्याचप्रमाणे या दुकानाच्या बाजूलाच असलेल्या राजेंद्र येलपुल्ला यांच्या माऊली एंटरप्राईजेस दुकानातील १ हजार रुपये, श्याम शिंदे यांचे युनिटी मेडिकेअर दुकानातील २ हजार रुपये आणि संतोष वगदे यांच्या शिवानी रेडीमेड ड्रेसेस या दुकानातील २० रेनकोट, ३० जीन्स पॅन्ट, १० छत्र्या, अंडरविअरचे ६ बॉक्स असा २६ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला. तसेच वसमत रोडवरील जागृती कॉम्प्लेक्समधील शाल्वी लेडीज वेअर दुकानाचे शटर वाकवून १ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.तसेच जुने आरटीओ कार्यालय परिसरातील कृषीधन इलेक्ट्रीक्स दुकानाचे शटर तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. एकाच रात्री सहा दुकान फोडल्याने या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान या प्रकरणी तुळजाभवानी मेडीकलचे मालक दीपक दीनानाथ कुचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हे.कॉ.विठ्ठल राठोड, विनोद मुळे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.चोरटे सीसीटीव्ही कॅमेºयात कैदया परिसरात असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेºयात चोरटे कैद झाले आहेत. विशेष म्हणजे, बोलेरो गाडी घेऊन हे चोरटे चोरी करण्यासाठी आले होते. चोरी करण्यापूर्वी चार चोरटे सीसीटीव्ही कॅमेरा फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे कॅमेºयात दिसत आहे. मात्र या कॅमेºयात गाडीचा क्रमांक दिसत नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे.मानवतमध्ये दोन ज्वेलर्स दुकान फोडलेमानवत : मंगळवारी पहाटे २ ते ६ वाजेच्या दरम्यान शहरातील दोन ज्वेलर्स दुकान फोडून चोरट्यांनी पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. गोदु गल्लीतील कृष्णा ज्वेलर्स या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, नगदी ६ हजार रुपये, सीसीटीव्ही कॅमेºयाचे डीव्हीआर असा १ लाख ७३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. तसेच तिरुपती ज्वेलर्स, व्यंकटेश इलेक्ट्रॉनिक, जुन्या बसस्थानक परिसरातील पुष्कर हार्डवेअर या दुकानांत चोरीचा प्रयत्न झाला. प्रज्योत सुधाकर उदावंत यांच्या फिर्यादीवरुन मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका वागळे, पोलीस निरीक्षक मीना कर्डक यांनी घटनास्थळी भेट देऊन मुख्य रस्त्यावरील सीसीटीव्ही असणाºया दुकानांत त्यांनी पाहणी केली.‘सीसीटीव्ही’फुटेज पळविलेपरभणी, मानवत आणि पाथरी या तिन्ही ठिकाणीच्या घटनात चोरट्यांचे सीसीटीव्ही कॅमेºयांकडे लक्ष असल्याचे दिसून आले. परभणीत प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कॅमेरा फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. तर मानवत आणि पाथरी येथे चोरी केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजचा रेकॉर्डरच पळविला आहे़पाथरीत पाच दुकाने फोडलीपाथरी : शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्गावर मोंढा परिसरात पाच दुकानांचे शटर तोडून चोरट्यांनी ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. वर्दळीच्या भागात ही घटना घडल्याने व्यापारी धास्तावले आहेत.पाथरीतील मोंढा परिसरातील तीन कृषी, एक कापड आणि एक किराणा अशा पाच दुकानांचे शटर वाकवून चोरट्यांनी ही चोरी केली. संजय पामे यांच्या धनलक्ष्मी कृषी केंद्रातून २१ हजार ६०० रुपये, दत्तात्रय तायनाक यांच्या गजानन कृषी केंद्रातील १२ हजार रुपये, जयवंत माहिपाल यांच्या श्री गणेश कापड दुकानातून ४५०० रुपये, जयवंत कापड दुकानातून ८५०० रुपये, अशोक काळे यांच्या कोमल प्रोव्हीजन्समधून २३२० रुपये, दिनेश वाडेकर यांच्या दिनेश कृषी केंद्रातून ४ हजार रुपये अशा पाच दुकानांत चोरी करुन ५७ हजार ८०३ रुपये चोरट्यांनी लांबविले. सकाळी ६ वाजेच्या सुमारास व्यापाºयांना चोरीचा प्रकार निदर्शनास आला. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा झाल्यानंतर संजय पामे यांच्या फिर्यादीवरुन पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस निरीक्षक व्ही.डी. श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक के.व्ही. बोधगिरे तपास करीत आहेत.श्वानपथक घुटमळलेघटनेनंतर परभणी येथील श्वान पथकास पाचारण करण्यात आले. मात्र श्वान माग काढू शकले नाही. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, उपनिरीक्षक सुनील गोपीनवार, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, शंकर गायकवाड, छगन सोनवणे, विशाल वाघमारे, अरुण कांबळे यांनी घटनास्थळाची पाहणी करुन तपास सुरू केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका वागळे यांनीही घटनास्थळाला भेट दिली.दुकाने ठेवली बंदया घटनेच्या निषेधार्थ शहरातील व्यापाºयांनी मंगळवारी दिवसभर दुकाने बंद ठेवली होती. घटनेचा तातडीने तपास करुन आरोपींना अटक करावी, अशी मागणी व्यापारी महासंघाचे आरीफ खान, राजीव पामे यांनी केली.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसtheftचोरी