शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

कबरस्तानकडे जाण्यास रस्ताच नाही; मृतदेह मुख्य रस्त्यावर ठेवून मुस्लिम बांधवांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 18:37 IST

गावातील मुस्लिम कबरस्तानकडे जाण्यासाठी कोणताही रस्ता उपलब्ध नसल्याने मृतदेह थेट मुख्य रस्त्यावर ठेवत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

- विठ्ठल भिसे पाथरी  ( जि. परभणी): "कबरस्तानकडे जाण्यासाठी रस्ताच नसेल तर अंत्यविधी कसा करायचा?" असा संतप्त सवाल उपस्थित करत पाथरी तालुक्यातील रेणापूर गावातील मुस्लिम बांधवांनी मृतदेहास रस्त्यावर ठेवून निषेध आंदोलन छेडले. गावातील मुस्लिम कबरस्तानकडे जाण्यासाठी कोणताही रस्ता उपलब्ध नसल्याने मृतदेह थेट मुख्य रस्त्यावर ठेवत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हा प्रकार ३० मे रोजी दुपारी घडला. 

पाथरी तालुक्यातील रेणापूर गावातील पाटीपासून सुमारे ५०० मीटर अंतरावर मुस्लिम समाजाचा कबरस्तान आहे. मात्र, तेथे जाण्यासाठी सध्या केवळ पाऊल वाट असून, पक्का रस्ता नाही. या रस्त्याच्या मागणीसाठी समाजबांधव गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत, मात्र प्रशासनाने अद्याप गांभीर्याने दखल घेतलेली नव्हती.

दरम्यान, 30 मे रोजी गावात एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी कबरस्तानात नेण्यासाठी मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या. सध्या सुरु असलेल्या पावसामुळे वाटेवर चिखल व दलदल झाल्याने मृतदेह कबरस्तानात नेणे अशक्य झाले. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह मुख्य रस्त्यावर ठेवत निषेध नोंदवला. तहसीलदार येईपर्यंत मृतदेह हटवणार नाही असा ठाम पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. तसेच "जर तहसीलदार आले नाहीत, तर मृतदेह थेट तहसील कार्यालयासमोर नेण्यात येईल, असा इशाराही दिला.

घटनेची माहिती मिळताच गावचे उपसरपंच तथा शिवसेनेचे शेतकरी सेना जिल्हा प्रमुख विक्रम गायकवाड यांनी तहसीलदार एस. एन. हांदेश्वार यांना तातडीने संपर्क साधून संपूर्ण प्रकार कळवला. घटनेचे गांभीर्य ओळखून तहसीलदार हांदेश्वार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाहणी करून आठ दिवसांत रस्त्याचा प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन दिले. यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेत मृतावर अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडली.

कबरस्थानकडे जाण्यास रस्ता नाही. अनेकवेळा पाठपुरावा केला. मात्र प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे शेवटी टोकाचे पाऊल उचलावे लागले. - विक्रम गायकवाड, उपसरपंच, ग्रा प  रेणापूर  ता पाथरी

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलन