शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

धावत्या बसचे टायर निखळले; पिकअप चालकाच्या प्रसंगावधानाने ६२ प्रवासी बचावले

By मारोती जुंबडे | Updated: August 9, 2023 17:42 IST

परळी येथील पिकअप चालक भागवत मुंढे ठरले देवदूत

पालम : पीकअप चालकाच्या प्रसंगावधानामुळे टायर निखळलेल्या बसमधील ६२ प्रवाशांचा जीव वाचला. त्यांच्यासाठी पीकअप चालक भागवत मुंडे ( रा. परळी, जि. बीड) देवदूत ठरले. ही घटना गंगाखेड-पालम राष्ट्रीय महामार्गावरील केरवाडी शिवरात बुधवारी दुपारी १ वाजता घडली.

गंगाखेड आगाराची एमएच- २२ बीएल- १७९३ क्रमांकाची बस गंगाखेडहून पालमकडे ६२ प्रवाशी घेऊन निघाली. ती केरवाडी शिवारात आली असता तिचे पाठीमागील एक चाक निखळले. तेंव्हा सदर बस भरधाव वेगाने होती. त्यामुळे निखळलेले चाक जवळपास १०० फूट अंतरावरील नालीत जाऊन पडले. तेंव्हा सदर बस एका टायरवर धाऊ लागली. ते टायर देखील पलिकडच्या बाजूला गेले होते. हे दृश्य समोरून येणाऱ्या पीकअप चालक भागवत मुंडे यांनी पाहिले. लागलीच त्यांनी बस थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ओरडून बस चालकास हातवारे केले. 

ते बस चालक माणिक विठलराव टोने यांनी पहिले. सुरुवातीला त्यांनी डाव्या बाजूचे चाक पहिले, ते व्यवस्थित होते. त्यानंतर त्यांनी डाव्या बाजूला पहिले, तेंव्हा त्यांच्या लक्षात आले. तातडीने त्यांनी बसला ब्रेक लावला. त्यावेळी काहीतरी अनुचित प्रकार घडल्याचे प्रवाशांना लक्षात आले. ते खाली उतरल्यावर हा सगळा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. तेव्हा त्यांनी ईश्वराचे आभार मानले. कारण बसचे टायर निघून जाण्याऐवजी पलीकडच्या दिशेने गेल्यामुळे ब्रेक लावेपर्यंत अपघात झाला नव्हता.

वेळेवर बस थांबली पालमहुन गंगाखेडकडे जात असताना माझ्यासमोरच बसचे टायर निखळले. ते बसच्या वेगामुळे लांब अंतरावर जाऊन पडल्याचे मी पाहिले. त्यानंतर लागलीच मी बस चालकास हातवारे ओरडून सांगितले. परंतू बस चालकाच्या लक्षात आले नाही, असे मला पहिल्यांदा वाटले. मी माझी पीकअप थांबविली. शिवाय, समोरून आलेली दुचाकीला थांबून बसचा पाठलाग करण्याचा बेत केला होता. परंतु, माझा इशारा बस चालकास समजल्याने त्यांनी वेळेवर बस थांबविली होती.- भगवत मुंडे, पीकअप परळी वैजनाथ, जि. बीड.

टॅग्स :state transportएसटीAccidentअपघातparabhaniपरभणी